Skip to main content

पळसदरी गावात महानगर गॅस आणि इनेबल हेल्थ सोसायटी यांच्या माध्यमातून आरो प्लँन्टची उभारणी.

कर्जत रायगड :-
महानगर गॅस आणि इनेबल हेल्थ सोसायटी यांच्या CSR फंडातुन पळसदरी गावासाठी आरो प्लँन्टची उभारणी करण्यात आली आहे. या आरोच्या पाण्यामुळे पळसदरी करांचे आरोग्य स्वस्थ राहण्यास मदत होणार आहे. या प्लांटच उद्घाटन बुधवारी पळसदरी ग्रामपंचायतीचे सरपंच जयेंद्र देशमुख आणि महानगर गॅसचे प्रमुख शर्विन फ्रॅन्सिस यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच देशमुख यांनी महानगर गॅसचे आभार मानले आहेत. त्या सोबतच या प्रमाणेच तुम्ही आम्हाला सहकार्य कराल अशी अपेक्षा सरपंचांनी यावेळी बोलताना व्यक्त केली आहे. गावात हा प्रकल्प आण्यासाठी ॲड. प्रदीप सुर्वे यांनी विशेष मेहनत घेतली आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे आज गावकऱ्यांना प्युरिफायरचे पाणी मिळणार आहे. त्यामुळे यात सर्वात मोठा वाटा कोणाचा असेल तर तो ॲड. प्रदीप सुर्वे यांचा आहे. या प्रकल्पाची उभारणी करताना गावातील ज्या लोकांनी आम्हाला मदत केली त्यामुळेच आम्ही इथे हा प्रकल्प उभारून शकलो. आणि यांच्या मदती शिवाय आम्ही आमचा प्रकल्प पुढे सुरू ठेवू शकत नाही अस मत व्यक्त करत इनेबल हेल्थ सोसायटीचे दीपक काळनकर यांच्यावतीने ग्रामस्थ ॲड. प्रदीप सुर्वे, महेंद्र शिंदे आणि दत्तात्रेय दरेकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. महानगर गॅस आणि इनेबल हेल्थ सोसायटी यांच्या मार्फत उभारण्यात आलेल्या सर्वजल शुद्ध पाणी प्रकल्पाच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना एक कार्ड देण्यात आला आहे. हे कार्ड स्कॅन करून ग्रामस्थांना यातून पाणी घेता येणार आहे. या प्रकल्पाच्या ऑपरेटिंग साठी ग्रामस्थ दत्तात्रेय दरेकर यांची निवड करण्यात आली आहे. ज्यांना हे कार्ड हवं असेल त्यांनी दत्तात्रेय दरेकर यांच्यासोबत संपर्क साधावा अस आवाहन यावेळी दीपक काळनकर यांनी केलं आहे. यावेळी माजी उपसरपंच नेञा दरेकर, वसंत पालांडे, तुकाराम निगुडकर, नारायण दरेकर, संदिप सुर्वे, नरेंद्र दरेकर, प्रकाश सुर्वे, ज्ञानेश्वर सुर्वे, महेंद्र निगुडकर, विलास दरेकर आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे

खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...

रेसिलियेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून एक्स्प्रेस वेवर प्रथमोपचार प्रशिक्षण शिबिराचे आयोजन.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर होणाऱ्या अपघातात मदत करणारे पळस्पे आणि बोरघाट पोलिस विभागाचे अधिकारी व कर्मचारी, रस्त्यांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, टोल प्लाझा मधले आय. आर. बी. चे कर्मचारी व महामार्गावर दुरुस्ती काम करणाऱ्या कामगाराना रेसिलियेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून गोल्डन अवर मध्ये उपचार आणि बचाव कार्य संबंधीचे धडे भूपेंद्र मिश्रा यांनी दिले. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या संसाधनातून, तंत्रशुद्धरित्या, तत्काळ आणि सहजपणे प्रथम उपचार कसे करता येतात, याबद्दल प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. अपघातात चुकीच्या पद्धतीने जखमींना हाताळल्याने गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात हे वेगवेगळ्या पद्धतीने शिबिरार्थींना समजावून देत तसे प्रकार टाळण्याकरिता योग्य उपाय सुचविले. रेसिलियेंट फाऊंडेशने आयोजित केलेल्या शिबीराचे संदर्भात अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या गुरुनाथ साठेलकर यांनी प्रास्ताविक केले तर पोलिस वाहतूक विभागाकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी यांनी आभार व्यक्त केले. रेसिलियेंट फाऊंडेशन, महाराष्ट्र पोलीस, वाहतूक पोलिस यंत्रणा आणि प्र...

आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनीचा वर्धापन दिन लोहोप प्रा आ केंद्रात उत्साहात साजरा,केंद्रीय आरोग्य मंत्रीनि साधला ऑनलाइन संवाद

किशोर साळुंके :- आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी या उपक्रमाच्या चौत्या वर्धापणदिना निमित्ताने केंद्रीय आरोग्य मंत्री यांनी ऑनलाइन संवाद साधण्यासाठी रायगड जिल्ह्यातील नव्यानेच सुरू झालेल्या खालापूर तालुक्यातील लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्रातीळ आरोग्य अधिकारी डॉ सीमा पाईकराव यांची निवड करण्यात आली असून लोहोप येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून या उपक्रमाचे उदघाटन करण्याचा मान लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळाला असून या उपक्रमाचे उदघाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुधाकर मोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडवैया यांनी आरोग्य कर्मचारी आणि रुग्णांशी संवाद साधून विविध प्रकारे मार्गदर्शन केले. भारत सरकार कडून चार वर्षांपूर्वी 14 एप्रिल 2018 रोजी आरोग्य विभागाकडून आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी हा उपक्रम सुरू करण्यात आला होता या उपक्रमाला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे या निमित्ताने या उपक्रमाचा आज चौथा वर्धापनदिन आहे.त्यामुळे प्रत्येक जिल...