Skip to main content

खोपोलीमधिल मत्स्य व्यवसायिकामुळे पाताळगंगा दूषित

खोपोली - खोपोली नगरीतील महाराष्ट्र शासनाच्या मत्स्य विभागामार्फत सुरु असलेल्या केंद्रातील घाण पाणी पाताळगंगेत सोडल्याने पाणी प्रदूषित होत असल्याने संताप व्यक्त होत आहे. खोपोली नगरीतील परम पूज्य गगनगिरी आश्रमा समोर महाराष्ट्र शासनाच्या अधिकारात मत्स्य विभागाचे केंद्र सुरु असून नव्याने लाखो रुपयांचा ठेका भरून एका व्यवसायिकाने येथे काही वर्षांसाठी काम घेतले आहे. त्याच्या जागेतील सांडपानी /दुर्गंधीयुक्त पाणी /सडलेल्या माशाच्या अवयवांचे पाणी हे पाताळगंगेत सोडण्यात येत असून त्यापासून नागरिकांना त्रास होत आहे. खोपोली पासून पेण पर्यंत या गंगेचा प्रवाह सुरु असून अनेक ठिकाणी या गंगेचे पाणी पिले जाते व आवश्यक कामासाठी वापरले जाते. पण सध्या येथिल व्यवसायिकामुळे पाणी प्रदूषित होत असून संबंधितावर कारवाई व्हावी यासाठी मागणी होत आहे.. .... संबंधित व्हिडीओ मध्ये सांडपानी पाताळगंगेत सोडताना live दिसत आहे. ............... ⭕️संपादक ⭕️

Comments