Skip to main content

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या अक्षेपार्ह वक्तव्याविरोधात खोपोलीत राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा जोडो मारो आंदोलन

किशोर साळुंके /खोपोली :-- विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलेल्या अक्षेपार्ह वक्तव्याविरोधात खोपोलीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे महिलांना जोरदार घोषणाबाजी केली. आ.दरेकरांच्या फोटो जोडे मारून आंदोलन करीत निषेध व्यक्त करीत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.              पुणे जिल्ह्यातील शिरूरमध्ये आद्य क्रांतिकारी राजे उमाजी नाईक यांचा जयंती सोहळा कार्यक्रमादरम्यान आपल्या भाषणात प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादीवर हल्लाबोल करीत राष्ट्रवादी काँग्रेसला गरीब लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ‘रंगलेल्या गालाचा’ मुका घेणारा पक्ष आहे असा टोला लावणी साम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या पक्षप्रवेश दरम्यान आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने महिला प्रदेश अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांनी दरेकरांचा खरपूस समाचार घेत महिला पदाधिकाऱ्यांंना राज्यभर आंदोलन करण्याचे आदेश देताच राष्ट्रवादी काँग्रेस खोपोली शहराच्या वतीने गुरूवार दि.16 सप्टेंबर रोजी सकाळी -11 वा.डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोरील पटांगणात जोरदार घोषणाबाजी करीत दरेकरांच्या फोटो जोडे मारून आंदोलन केले.यावेळी नगराध्यक्षा सुमन औसरमल,नगरसेवक मोहन औसरमल,राष्ट्रवादी युवक शहर अध्यक्ष अतुल पाटील,महिला शहर अध्यक्षा सुवर्णा मोरे,नगरसेविका सविता गायकवाड,सेक्रटरी जयश्री डोंगरे, उपाध्यक्षा अश्विनी ढोले,प्रज्ञा महाडिक,उर्मिला गायकवाड, प्रियाका मोरे,भाग्यश्री गुडूर,गौरी भस्मे,महिला कार्यकर्त्या तसेच चित्रपट सांसकतिक विभाग शहर अध्यक्ष अमित पवार, युवकचे सल्लागार विनोद रजपूत, भास्कर लांडगे,विशाल गायकवाड,जयेश गोसावी आदि पदाधिकारी उपस्थित होते.       भाजपाची अवस्था पाण्यात तडफडणाऱ्या माशांसाखरी झाली आहे असा शब्दात नगराध्यक्षा सुमन औसरमल यांनी समाचार घेत फुले,शाहू,आंबेडकरांच्या विचारांवर राष्ट्रवादी पक्ष काम करीत आहे.खोपोली शहरातही पक्षाच्या विचारावरांवरच तळागळातील लोकांची कामे करता कोणत्याही पक्षाविरोध न करता सर्व पक्षांना सोबत घेवून काम करतो पण विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांनी केलेल बेताल वक्तव्याचा शेवटी नगराध्यक्षा औसरमल यांनी निषेध व्यक्त केला आहे.भाजपाचे आमदार राम कदम यांच्या नंतर विरोधीपक्षनेते दरेकर यांनी केले वक्तव्यामुळे संबध महिलांचा आपमान सिध्द होत आहे.फुले,शाहू,आंबेडकर,छत्रपती शिवाजी महाराज,जिजाऊ,सावित्री फुले यांच्या राज्यात महिलांविषयी केलेले अक्षेपार्ह विधान सहन करणार नसल्याचा इशारा महिला शहर अध्यक्षा सुवर्णा मोरे यांनी देत भाजप वेळोवेळी महिलांविषयी चुकीचे विधान करते त्यामुळे महिलांवर अत्याचार वाढत असून त्याला वाव मिळत असल्याची खंत व्यक्त करीत आ.दरेकर यांच्यावर कारवाईची मागणी निवेदनातून महिला शहर अध्यक्षा मोरे यांनी केली आहे.        जोडो मारो आंदोलन केल्यावर खोपोली पोलिस निरिक्षक शिरीष पवार यांच्याकडे निवेदन देत कारवाई मागणी करीत आंदोलनाचा समारोप करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे

खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...

रेसिलियेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून एक्स्प्रेस वेवर प्रथमोपचार प्रशिक्षण शिबिराचे आयोजन.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर होणाऱ्या अपघातात मदत करणारे पळस्पे आणि बोरघाट पोलिस विभागाचे अधिकारी व कर्मचारी, रस्त्यांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, टोल प्लाझा मधले आय. आर. बी. चे कर्मचारी व महामार्गावर दुरुस्ती काम करणाऱ्या कामगाराना रेसिलियेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून गोल्डन अवर मध्ये उपचार आणि बचाव कार्य संबंधीचे धडे भूपेंद्र मिश्रा यांनी दिले. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या संसाधनातून, तंत्रशुद्धरित्या, तत्काळ आणि सहजपणे प्रथम उपचार कसे करता येतात, याबद्दल प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. अपघातात चुकीच्या पद्धतीने जखमींना हाताळल्याने गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात हे वेगवेगळ्या पद्धतीने शिबिरार्थींना समजावून देत तसे प्रकार टाळण्याकरिता योग्य उपाय सुचविले. रेसिलियेंट फाऊंडेशने आयोजित केलेल्या शिबीराचे संदर्भात अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या गुरुनाथ साठेलकर यांनी प्रास्ताविक केले तर पोलिस वाहतूक विभागाकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी यांनी आभार व्यक्त केले. रेसिलियेंट फाऊंडेशन, महाराष्ट्र पोलीस, वाहतूक पोलिस यंत्रणा आणि प्र...

महिला रिक्षा चालक प्रतिक्षा प्रतिक्षा वाघमारे यांनी सूरु केलेल्या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक ..

खोपोली ( किशोर साळुंके ) खोपोली शहरातीत पहिल्या महिला रिक्षा चालक प्रतिक्षा वाघमारे आपल्या कुटुंबीयांना रिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक बळ देत आहेत.आपले कुटुंब सांभाळत असताना मात्र रिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून सामाजिक कार्यातही सक्रिय असतात.प्रतिक्षा वाघमारे यांनी रिक्षा व्यवसाय सुरु केल्याने त्यांची प्रेरणा घेत आज शहरात अनेक महिलांनीही रिक्षा व्यवसाय सुरु करुन स्वाभिमानाने आत्मनिर्भर होताना दिसून येत आहेत .जादा पैसे देणारे भाडे नाकारुन जेष्ठ नागरिकांसाठी व कुठे अपघात घडला असेल अथवा रात्री अपरात्री महिलांच्या प्रसुतीसाठी बोलावणे आलेच तर त्यांना प्रथम प्राधान्य देत वरिल अडचणीत असणार्यांना तात्काळ सेवा देण्यासाठी प्रतिक्षा वाघमारे नेहेमी तत्पर असतात.सद्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरु असुन या विद्यार्थ्यांना वेळेवर परिक्षा केंद्रा पर्यंत पोहोचण्यासाठी कोणतीही अडचण होवू नये यासाठी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सामाजिक बांधिलकी जपत एका अनोख्या सामाजिक उपक्रम सुरु करुन या विद्यार्थ्यांसाठी आपल्या रिक्षाच्या माध्यमातून मोफत सेवा स...