खोपोली (किशोर साळुंके )
रायगड जिल्हा कुस्तीगीर संघ, खालापूर तालुका कुस्तीगीर संघ आणि लायन्स क्लब खोपोली यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय २३ वर्षाच्या आतील मुले आणि मुली यांची कुस्ती निवड चाचणी २०२१ ही, दिनांक १ सप्टेंबर २०२१ रोजी लायन्स क्लब खोपोलीच्या सभागृहात संपन्न झाली. अत्यंत सुसज्ज पद्धतीने चाचणीचे आयोजन केले गेले होते. ग्रीको रोमन आणि फ्री स्टाईल प्रकारच्या कुस्त्या यावेळी खेळल्या गेल्या.
खोपोली नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सुमन औसरमल, लायन्स क्लब खोपोलीचे अध्यक्ष महेश राठी, खालापूर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष सुनील पाटील, खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत चाचणी स्पर्धेचे उद्घाटन संपन्न झाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष घासे यांनी केले, कुस्तीगीर संघाचे सदस्य राजू गायकवाड, लायन्स क्लब ऑफ खोपोलीचे महेश राठी, खोपोली नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सुमन औसरमल, खालापूर कुस्ती संघाचे अध्यक्ष सुनील पाटील यांनी कुस्तीगिरांना आपल्या भाषणातून मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. छत्रपती पुरस्कार विजेते मारुती आडकर यांनी आभार प्रदर्शन तर सूत्रसंचालन जगदीश मरागजे यांनी केले.
रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातले कुस्तीगीर या चाचणी स्पर्धेमध्ये दाखल झाले होते. आंतरराष्ट्रीय नियम आणि निकषानुसार अत्यंत चुरशीच्या मॅटवरील कुस्ती चाचणी स्पर्धा संपन्न झाली. स्पर्धेची तांत्रिक बाजू राजाराम कुंभार आणि सुनील नांदे यांनी पाहिली.
या निवड चाचणीतून यशस्वी झालेल्या कुस्तीगिरांना राज्य स्पर्धेत आपले नशीब आजमावण्याची संधी मिळणार आहे. 4 आणि 5 सप्टेंबर 2021रोजी इंदापूर येथे राज्य स्थरावरील स्पर्धा संपन्न होणार आहे.
या रोमन कुस्ती स्पर्धेत भाग घेणार्यां सर्धकांची नावे खालील प्रमाणे आहेत...
55 किलो गट - गुलशन कुमार चौरसिया, खालापूर
60 किलो गट - किरण गायकवाड पनवेल,
63 किलो गट - सूयश कडवे अलिबाग,
67 किलो गट - विराज पाटील अलिबाग,
72 किलो गट - भगत अलिबाग,
77 किलो गट - सुजन म्हात्रे पनवेल,
82 किलो गट - करण बामगुडे पनवेल,
130 किलो गट - संदीप धामी खालापूर,
फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धा मुले
57 किलो गट - श्रीनाथ पाटील अलिबाग,
61 किलो गट - ओमकार गायकर पनवेल,
65 किलो गट - रोषण धुळे कर्जत,
70 किलो गट - श्रेयश घुले अलिबाग,
74 किलो गट - दिवेश पालांडे, खालापूर,
79 किलो गट -जयेश खरमारे खालापूर ,
80 किलो गट - शुभम वरखडे पनवेल,
92 किलो गट - प्रवण दुर्गे कर्जत,
97 किलो गट - ऋषिकेश देशमुख खालापूर,
125 किलो गट -ओमकार पवार खालापूर ,
फ्रीस्टाईल कुस्ती मुली
विनिता गवंडी - पनवेल 50 किलो गट,
विशाखा गंगावणे -कर्जत53 किलो गट,
अमेया घरत - पनवेल 55 किलो गट,
रोशनी परदेशी- खालापूर 57 किलो गट,
प्रांजली कुंभार - खालापूर 59 किलो गट,
साक्षी शिंदे - पेण 62 किलो गट,
प्राची भोईर - खालापूर 65 किलो गट.
नेहा पाटील - खालापूर 73 किलो गट
सानिका सुर्यवंशी -खालापूर 76 किलो गट
या चाचणी स्पर्धेत एकूण 130 कुस्तीगीरांनी भाग घेतला होता.
तालुक्यातले कुस्तीगीर या चाचणी
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर होणाऱ्या अपघातात मदत करणारे पळस्पे आणि बोरघाट पोलिस विभागाचे अधिकारी व कर्मचारी, रस्त्यांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, टोल प्लाझा मधले आय. आर. बी. चे कर्मचारी व महामार्गावर दुरुस्ती काम करणाऱ्या कामगाराना रेसिलियेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून गोल्डन अवर मध्ये उपचार आणि बचाव कार्य संबंधीचे धडे भूपेंद्र मिश्रा यांनी दिले. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या संसाधनातून, तंत्रशुद्धरित्या, तत्काळ आणि सहजपणे प्रथम उपचार कसे करता येतात, याबद्दल प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. अपघातात चुकीच्या पद्धतीने जखमींना हाताळल्याने गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात हे वेगवेगळ्या पद्धतीने शिबिरार्थींना समजावून देत तसे प्रकार टाळण्याकरिता योग्य उपाय सुचविले. रेसिलियेंट फाऊंडेशने आयोजित केलेल्या शिबीराचे संदर्भात अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या गुरुनाथ साठेलकर यांनी प्रास्ताविक केले तर पोलिस वाहतूक विभागाकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी यांनी आभार व्यक्त केले. रेसिलियेंट फाऊंडेशन, महाराष्ट्र पोलीस, वाहतूक पोलिस यंत्रणा आणि प्र...
Comments
Post a Comment