Skip to main content

गणेशोत्सवात योगदान देणाऱ्यांचा खोपोली नगर पालिका प्रशासनाने केला गौरव.

. खोपोली : २० सप्टेंबर २०२१ खोपोली नगर परिषद हद्दीतील घरगुती आणि सार्वजनिक स्तरावर यंदाच्या गणेशोत्सव आयोजनात, आपले बहुमोल योगदान देऊन नगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्यासोबत सुरक्षा, स्वच्छता आणि सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्यात महत्त्वाची भूमिका वठवलेल्या संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे खोपोली नगरपालिका कार्यालयातील नगराध्यक्षांच्या दालनात गौरव आणि कौतुक करण्यात आले. खोपोलीच्या नगराध्यक्षा सुमन औसरमल, उपनगराध्यक्षा विनिता कांबळे, मुख्याधिकारी अनुप दुरे, पोलीस अधिकारी हरेश कळसेकर, यांच्यासह ज्येष्ठ नगरसेवक मोहन औसरमल, बेबी शेठ सॅम्युअल, किशोर पानसरे यांच्या उपस्थितित सन्मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. गणेशोत्सव काळात सर्वांनी दिलेल्या योगदानाबद्दल पोलीस अधिकारी हरेश कळसेकर, उपनगराध्यक्षा विनिता कांबळे, नगराध्यक्षा सुमनगणेशोत्सवात योगदान देणाऱ्यांचा खोपोली नगर पालिका प्रशासनाने केला गौरव खोपोली नगर परिषद हद्दीतील वर्ष 2021च्या गणेश उत्सव आयोजनात आपले बहुमोल योगदान देऊन नगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्यासोबत गणेश भक्तांची सुरक्षा, सार्वजनिक स्वच्छता आणि सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्यात महत्त्वाची भूमिका वठवलेल्या संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा खोपोली नगरपालिका कार्यालयातील नगराध्यक्षांच्या दालनात गौरव करण्यात आला. खोपोलीच्या नगराध्यक्षा सुमन औसरमल, उपनगराध्यक्षा विनिता कांबळे, मुख्याधिकारी अनुप दुरे, पोलीस अधिकारी हरेश कळसेकर, यांच्यासह ज्येष्ठ नगरसेवक मोहन औसरमल, बेबी शेठ सॅम्युअल, किशोर पानसरे यांच्या उपस्थित सन्मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात येत असताना सर्वांच्या योगदानाबद्दल पोलीस अधिकारी कळसेकर उपनगराध्यक्ष अभिनेता कांबळे नगराध्यक्षा सुमन औसरमल यांनी आपल्या मनोगतातून सर्वांचे आभार मानले. भविष्यात ज्या ज्या वेळी आवश्यकता असेल त्या त्या वेळी सर्वांनी असेच सहकार्य करून आपले सामाजिक दायित्व निभविण्यासाठी योगदान द्यावे असे आवाहन केले. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, सहज सेवा फाउंडेशन, रोट्रॅक्ट क्लब ऑफ खोपोली, मोरया मित्र मंडळ, वरद विनायक मित्र मंडळ तसेच मोगलवाडी आणि भानवज येथील युवकांना यावेळी सन्मानित केले गेले. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे गुरुनाथ साटेलकर यांनी नगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्यासोबत सातत्याने सहकार्याची भूमिका ठेवून नेहमीच सर्वांचे सहकार्य राहील असे आश्वासन दिले. गणेशोत्सवाच्या निमित्ताने युवकांपासून वृद्धांपर्यंत, सर्वच जाती धर्माच्या स्वयंसेवकांनी दिलेले योगदान, त्या योगदानाची प्रशासनाच्या वतीने घेतली गेलेली दखल आणि त्या अनुषंगाने झालेला सर्वांचा गौरव, या बाबी खऱ्या अर्थाने सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या, सामाजिक सलोखा आणि एकात्मता टिकवणाऱ्या असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.

Comments

Popular posts from this blog

रेसिलियेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून एक्स्प्रेस वेवर प्रथमोपचार प्रशिक्षण शिबिराचे आयोजन.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर होणाऱ्या अपघातात मदत करणारे पळस्पे आणि बोरघाट पोलिस विभागाचे अधिकारी व कर्मचारी, रस्त्यांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, टोल प्लाझा मधले आय. आर. बी. चे कर्मचारी व महामार्गावर दुरुस्ती काम करणाऱ्या कामगाराना रेसिलियेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून गोल्डन अवर मध्ये उपचार आणि बचाव कार्य संबंधीचे धडे भूपेंद्र मिश्रा यांनी दिले. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या संसाधनातून, तंत्रशुद्धरित्या, तत्काळ आणि सहजपणे प्रथम उपचार कसे करता येतात, याबद्दल प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. अपघातात चुकीच्या पद्धतीने जखमींना हाताळल्याने गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात हे वेगवेगळ्या पद्धतीने शिबिरार्थींना समजावून देत तसे प्रकार टाळण्याकरिता योग्य उपाय सुचविले. रेसिलियेंट फाऊंडेशने आयोजित केलेल्या शिबीराचे संदर्भात अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या गुरुनाथ साठेलकर यांनी प्रास्ताविक केले तर पोलिस वाहतूक विभागाकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी यांनी आभार व्यक्त केले. रेसिलियेंट फाऊंडेशन, महाराष्ट्र पोलीस, वाहतूक पोलिस यंत्रणा आणि प्र...

खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे

खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...

खालापूर प्रेस क्लबचा वर्धापन दिन व  पुरस्कार प्रधान सोहळा उत्साहात संपन्न

(खोपोली - किशोर साळुंके ) ) - रायगड प्रेस क्लब संलग्न खालापूर प्रेस क्लब चा १४ वा वर्धापन दिन व पुरस्कार वितरण सोहळा रविवार दि .२४ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्याला खासदार श्रीरंग बारणे , आमदार महेंद्रशेठ थोरवे प्रमुख पाहुणे म्हणून व विशेष अतिथी म्हणून खोपोलीच्या माजी नगराध्यक्ष सुमन औसरमल , राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस हनुमंत पिंगळे, दत्ताजी मसुरकर, शिवसेना नेते सुनिल पाटील, पंचायत समिती सदस्या श्रद्धा साखरे, जेष्ठ नगरसेवक मोहन औसरमल, मतदार संघ अध्यक्ष संतोष बैलमारे, महड देवस्थानच्या कार्याध्यक्ष मोहिनी वैद्य, लायन्स क्लब अध्यक्ष महेश राठी , शेकाप चिटणीस संदीप पाटील, यांच्या सह सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी व रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष भारत रांजणकर उपस्थित होते. यावेळी खास पत्रकारांसाठी मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते यात आघाडीच्या वृत्त निवेदिक विलास बडे यांनी आजकी पत्रकारिता या विषयावर अत्यंत महत्वपूर्ण व मार्मिक भाषेत मार्गदर्शन केले . वर्धापन दिनानिमित्त खोपोली व खालापूर तालुक्यात राजकीय, वैद्यकीय, सामाजिक , शैक्षणिक ...