‘
खोपोली :(किशोर साळुंके )- देशातील विविध संघटनांनी येत्या 27 सप्टेंबर रोजी भारत बंदची हाक दिली आहे. शिवशाही व्यापारी संघाने या बंदला पाठिंबा दिला आहे. शिवशाही व्यापारी संघाचा या भारत बंदला संपूर्ण पाठिंबा असणार असून या बंदमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असं आवाहन युवराज दाखले यांनी केलं आहे.
युवराज दाखले यांनी खोपोली या ठिकाणी हॉटेल यादगार या ठिकाणी प्रमुख पदाधिकारी यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी हे आवाहन केलं.
देशभरातील 100 पेक्षा जास्त संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे. सकाळी 10 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत हा बंद चालणार आहे. या बंदला आमचा पाठिंबा असून आम्ही बंदमध्ये सहभागी होऊ, असं दाखले यांनी सांगितलं. यावेळी शिवशाही व्यापारी संघ प्रणित शिवशाही वाहतुक आघाडी कोकण प्रदेश अध्यक्ष संगम जाधव,रायगड जिल्हाअध्यक्ष शेखर छोञे,खलापुर तालुका अध्यक्ष तथा मा सरपंच आनिल म्हामुनकर,खलापुर तालुका संघटक आमित जाधव,शिवशाही व्यापारी संघ खपोली शहर कायाॕध्यक्ष तौफीक करजीकर,रायगड जिल्हा संघटक भाऊ सनस,स्वयंमसेवक शाहीद शेख उपस्थित होते.
खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे
खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...
Comments
Post a Comment