खोपोली..(किशोर साळुंके )
खालापूरचे नवनियुक्त तहसीलदार आयुब तांबोळी, खोपोली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अनुप दुरे, खोपोली पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शिरीष पवार यांची भेठ भाजप पदाधिकारी यांनी घेतली. खालापूर तालुका व खोपोली शहरा मध्ये नियुक्ती झाल्या बद्दल या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्याचे स्वागत केले व सुभेच्छा दिल्या.
या वेळी झालेली चर्चे मध्ये खालापूरचे तहसीलदार आयुब तांबोळी यांना सध्या सुरू असलेल्या मतदार नोंदणी अभियान व मतदार ओळखपत्र यात येणाऱ्या अडचणीचे मुद्दे राहुल जाधव यांनी मांडले. तसेच या साठी कॅम्पचे आयोजन करावे असे श्रीकांत पुरी यांनी सांगितले.
मुख्याधिकारी अनुप दुरे यांना सुभाष नगरचा रास्ता (रेल्वे गेट/ मस्कॉ गेट ते जाधव मामा यांचा घरापरियांतचा रास्ता- जाधव मामा चौक) संदर्भात राहुल जाधव यांनी माहिती दिली.
ग्रामस्थांनी नवी रस्त्या साठी केलेले विरोध, तत्कालीन मुख्याधिकारी गणेश शेट्टे यांनी 50 वर्ष जुन्या रस्त्या डांबरीकरण केले आहॆ तसेच हा रस्ता सार्वजनीक रास्ता म्हणून घोषित करण्यात यावा या साठी खोपोली नगर परिषदेच्या सर्व साधारण सभेत मंजूर करण्यात आलेला ठराव. सुभाष नगर ग्रामस्थांनी या रस्त्याला खोपोली नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष स्वर्गीय सखाराम गेणू जाधव मार्ग असे नामकरण करण्यात यावे या मागणी ची माहीत दिली.
सुभाष नगर येथील स्वच्छता व आरोग्य संदर्भात थोडक्या चर्चा करण्यात आली.
भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत पुरी यांची शहरातील नगर परिषदेचे रखडलेल्या प्रकल्प व भविष्यातील उपाययोजना संदर्भात चर्चा झाली. शहरातील बाजारपेठ, समाज मंदिर रोड येथील समस्या सरचिटणीस ईश्वर शिंपी यांनी मांडले. वृक्षारोपण व यांचे संगोपन कार्यक्रम, पाणी आडवा पाणी जिरवा उपक्रमाचा माध्यमातून बांधलेल्या छोटे बंधारे बाबत माहिती चिटणीस गोपाळ बावस्कर आणि संजय म्हात्रे यांनी दिली.
खोपोली पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शिरीष पवार यांचा बरोबर विविध विषया संदर्भात सकारात्मक चर्चा झाली.
या प्रमुख अधिकाऱ्यांचे स्वागत भाजपचे युवा नेते शक्ती केंद्र प्रमुख *राहुल जाधव*, जिल्हा उपाध्यक्ष *श्रीकांत पुरी*, खोपोली शहर सरचिटणीस *ईश्वर शिंपी*, चिटणीस *गोपाळ बावस्कर*, शक्ती केंद्र प्रमुख *संजय म्हात्रे*, *दिलीप देशमुख*, भाजप वैदयकीय सेल खोपोली शहर सह-संयोजक *विकास खुरपुडे* यांनी केले.
खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे
खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...
Comments
Post a Comment