खोपोली शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या बेसुमार वाढली आहे. वारंवार नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेण्याचे, गाडीच्या मागे धावून पाठलाग करण्याचे प्रकार घडत असतात त्या अनुषंगाने होणारे अपघात वाढत चालले आहेत. काही महिन्यांपूर्वी शिळफाटा - खोपोली येथील एका लहान मुलाला रेबीजमुळे आपला प्राण गमवावा लागला होता. ह्या विषयातील गांभीर्य लक्षात घेऊन खोपोलीतील सजग प्राणी मित्रांनी व्ही. पी.डब्ल्यू. ए अर्थात पशु वैद्यकीय व्यवसायिक हितवर्धिनी संघटना - डोंबिवली यांच्या माध्यमातून श्री कृपा एक्वेरियम- खोपोली, विविध प्राणी औषध निर्माण संस्था, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, covid-19 ॲनिमल फिडर ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या कुत्र्यांसाठी अँटी रेबीज लसीकरण मोहिमेचे आयोजन 2 ऑक्टोंबर 2021 रोजी करायचे ठरवले आहे.
28 सप्टेंबर हा "अखिल विश्व श्वान दंश निवारण दिन" म्हणून साजरा केला जातो. त्याच अनुषंगाने ही मोहीम राबवून भटक्या कुत्र्यांचे अँटी रेबीज लसीकरण होणार आहे. दिनांक 2 ऑक्टोंबर पासून पुढील काही दिवस ही मोहीम राबवून खोपोली शहरातील 300 कुत्र्यांना भटक्या कुत्र्यांना लस दिली जाणार आहे. यासाठी होणारा सर्व खर्च संबधीत संघटना करणार असल्याची माहिती प्राण्यांचे डॉक्टर मुळेकर यांनी दिली.
डॉ मुळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री कृपा एक्वेरियमचे प्रवीण शेंद्रे, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे हनीफ कर्जीकर आणि इतर सदस्य, तसेच Covid-19 ॲनिमल फिडर ग्रुप अर्थात खोपोलीतील प्राणीप्रेमी या मोहिमेत सहभागी होणार आहेत .
अँटी रेबीज लसीकरणानंतर श्वान दंशाने गंभीर बाधा होण्यापासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे असे प्रवीण शेंद्रे यांनी स्पष्ट केले आहे.
खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे
खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...
Comments
Post a Comment