सांगली / प्रतिनिधी :- कोल्हापुरला निघालेले भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना सोमवारी पहाटे कराडात पोलिसांनी स्थानबद्ध केले. त्यानंतर सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत सोमय्या यांनी ठाकरे, पवार आणि मुश्रीफांवर गंभीर आरोप केले. काहीही झाले तरी मुश्रीफांचे घोटाळे बाहेर काढणार असल्याचे सांगून त्यांनी हे सरकार ठोकशाही करीत असल्याचा आरोप केला. दरम्यान, पत्रकार परिषदेनंतर किरीट सोमय्या पोलीस बंदोबस्तात पुन्हा मुंबईला रवाना झाले. यावेळी शहरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
कराडातील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले, आप्पासाहेब नलावडे सहकारी साखर कारखान्यात मुश्रीफांनी शंभर कोटींचा घोटाळा केला असून त्याची चौकशी होणे अपेक्षित आहे. पुढच्या आठवड्यात हसन मुश्रीफांचा आणखी एक घोटाळा मी समोर आणणार आहे. मी अर्थमंत्रालय, आयकर खात्याचे अध्यक्ष, ईडीचे संचालक, सहकार मंत्रालयामध्ये २ हजार ७०० पानांचे पुरावे दिलेत. त्यावर चौकशी सुरु झाली असून मी अधिक माहिती मागविली आहे, ती माहिती दोन दिवसांत मला मिळेल. ईडी आणि संचालक मंडळाकडून याची चौकशी सुरु आहे. त्या भीतीनेच राष्ट्रवादीचे गुंड माझ्यावर हल्ला करीत आहेत. हसन मुश्रीफांच्या स्वागतासाठी जनसमुदायाला परवानगी दिली जाते. मग, मला कोल्हापुरात येण्यास परवानगी का नाही? सध्या या प्रकरणावरून लक्ष वळवण्यासाठी शरद पवारांनी एक व्यूहरचना आखली आहे. मात्र, त्याचा काहीही परिणाम होणार नाही. मी मुश्रीफांचे घोटाळे बाहेर काढणारच आहे.
ठाकरे आणि पवारांची राज्यात दडपशाही सुरू आहे. त्यांच्याविरोधात कोणी गेल्यास ते त्याला दडपून ठेवण्याचा, अडवून ठेवण्याचा प्रयत्न करतात. पवारांनी आता या प्रकरणातून लक्ष हटविण्यासाठी नवी व्युहरचना आखली आहे. मात्र, त्याचा काहीही उपयोग होणार नाही. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी मला मुश्रीफांचे घोटाळे बाहेर काढण्यास सांगितले असून घोटाळ्याचे पुरावे मंगळवारी ‘ईडी’कडे देणार असल्याचेही सोमय्या यावेळी म्हणाले.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर होणाऱ्या अपघातात मदत करणारे पळस्पे आणि बोरघाट पोलिस विभागाचे अधिकारी व कर्मचारी, रस्त्यांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, टोल प्लाझा मधले आय. आर. बी. चे कर्मचारी व महामार्गावर दुरुस्ती काम करणाऱ्या कामगाराना रेसिलियेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून गोल्डन अवर मध्ये उपचार आणि बचाव कार्य संबंधीचे धडे भूपेंद्र मिश्रा यांनी दिले. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या संसाधनातून, तंत्रशुद्धरित्या, तत्काळ आणि सहजपणे प्रथम उपचार कसे करता येतात, याबद्दल प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. अपघातात चुकीच्या पद्धतीने जखमींना हाताळल्याने गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात हे वेगवेगळ्या पद्धतीने शिबिरार्थींना समजावून देत तसे प्रकार टाळण्याकरिता योग्य उपाय सुचविले. रेसिलियेंट फाऊंडेशने आयोजित केलेल्या शिबीराचे संदर्भात अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या गुरुनाथ साठेलकर यांनी प्रास्ताविक केले तर पोलिस वाहतूक विभागाकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी यांनी आभार व्यक्त केले. रेसिलियेंट फाऊंडेशन, महाराष्ट्र पोलीस, वाहतूक पोलिस यंत्रणा आणि प्र...
Comments
Post a Comment