खोपोली (किशोर साळुंके ):-
मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर खंडाळा घाटातल्या मंकी हिल जवळ दरड कोसळल्याने काही काळ रेल्वे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. तात्काळ त्या ठिकाणी कर्मचारीवर्ग पोचला आणि महामार्गावरचा अडथळा दूर केला होता. त्यासोबत कर्मचाऱ्यांनी काल दिनांक 4 सप्टेंबर रोजी सुरक्षेच्या दृष्टीने रेल्वे मार्गावर सर्वेक्षण सुरू केले असताना रेल्वे रुळावरून गाईचे वासरू वाट चुकून रुळावरून चालताना त्यांना दिसले. अपघात होऊ नये म्हणून कर्मचाऱ्यानी त्या वासराला बाजूला करण्याचे प्रयत्न केले, तोवर समोरून ट्रेन आली. ट्रेनचालकाने सावधानता दाखवत वेग कमी करून हॉर्न वाजवून वासराला सावध केले. अचानक घडलेल्या घडामोडीत भांबावलेले वासरू सैरभैर होवून दरीत कोसळले. ट्रेन पुढे जाताच गणेश पर्चंड, प्रचंड अमोल साठे, हरिष मौर्य आणि इतरजण वासराचा मागोवा घेण्यासाठी दरीत उतरले.
दरित कोसळलेले वासरू सुदैवाने लगतच्या पाईपलाईन मध्ये अडकलेले आढळले. सर्वांनी शिकस्त करून वासराला सुखरूप बाहेर काढले.
रेल्वे कर्मचाऱ्यांच्या या सतर्कतेमुळे वासराचे प्राण वाचले. भूतदया दाखवल्या बद्दल रेल्वेच्या अधिकारी वर्गाकडून या कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर होणाऱ्या अपघातात मदत करणारे पळस्पे आणि बोरघाट पोलिस विभागाचे अधिकारी व कर्मचारी, रस्त्यांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, टोल प्लाझा मधले आय. आर. बी. चे कर्मचारी व महामार्गावर दुरुस्ती काम करणाऱ्या कामगाराना रेसिलियेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून गोल्डन अवर मध्ये उपचार आणि बचाव कार्य संबंधीचे धडे भूपेंद्र मिश्रा यांनी दिले. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या संसाधनातून, तंत्रशुद्धरित्या, तत्काळ आणि सहजपणे प्रथम उपचार कसे करता येतात, याबद्दल प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. अपघातात चुकीच्या पद्धतीने जखमींना हाताळल्याने गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात हे वेगवेगळ्या पद्धतीने शिबिरार्थींना समजावून देत तसे प्रकार टाळण्याकरिता योग्य उपाय सुचविले. रेसिलियेंट फाऊंडेशने आयोजित केलेल्या शिबीराचे संदर्भात अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या गुरुनाथ साठेलकर यांनी प्रास्ताविक केले तर पोलिस वाहतूक विभागाकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी यांनी आभार व्यक्त केले. रेसिलियेंट फाऊंडेशन, महाराष्ट्र पोलीस, वाहतूक पोलिस यंत्रणा आणि प्र...
Comments
Post a Comment