Skip to main content

खोपोलीत शांतता कमिटीची बैठक संपन्न गणेश उत्सवाच्या पार्श्व भूमीवर सुरक्षा आणि कायदा विषयक झाली सकारात्मक चर्चा.

खोपोली पोलिस ठाणे हद्दीतील कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये यासाठी सर्वांनी महाराष्ट्र शासनाने निर्देशित केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करूनच गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी केले आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची, शांतता समिती सदस्य, मोहल्ला कमिटि सदस्य, समन्वय समिति सदस्य, पत्रकार वा सामाजिक संस्थांच्या पदाधिकारी यांची संयुक्तिक सभा पोलीस ठाण्याच्या सभागृहात पार पडली. या वेळी मा.नगराध्यक्षा सुमन औसरमल,उपनगराध्यक्ष विनिता कांबळे, महावितरणचे अधिकारी, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी गणेशोत्सव साजरा करण्याबाबत परिपत्रक जारी केले आहे. १० सप्टेंबर पासून गणेशोत्सव सुरू होत आहे. या वेळी सर्वांनी आपली व समाजाची काळजी घेऊनच गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन केले.
सार्वजनिक गणेशोत्सवासाठी खोपोली पोलीस तसेच खालापूर तहसीलदारांची परवानगी बंधनकारक राहील. दर्शनाला येणाऱ्यांची भाविक भक्तांची लेखी नोंद करून येथे मंडपात सॅनिटायझर ठेवावे. गणेश मूर्तीचे आगमन आणि विसर्जन मिरवणूक काढता येणार नाही. उत्सवात कमीत कमी खर्च करावा. मंडळांकडून आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात यावेत. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. अशा सूचना यावेळी करण्यात आल्या. त्याच सोबत साधकबाधक चर्चा व विचार विनिमय झाला. सर्वांनी पोलीस यंत्रणेकडून निर्देशित केलेल्या सूचनां मान्य करत योग्य सहकार्य करण्याचा संकल्प केला.

Comments

Popular posts from this blog

खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे

खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...

रेसिलियेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून एक्स्प्रेस वेवर प्रथमोपचार प्रशिक्षण शिबिराचे आयोजन.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर होणाऱ्या अपघातात मदत करणारे पळस्पे आणि बोरघाट पोलिस विभागाचे अधिकारी व कर्मचारी, रस्त्यांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, टोल प्लाझा मधले आय. आर. बी. चे कर्मचारी व महामार्गावर दुरुस्ती काम करणाऱ्या कामगाराना रेसिलियेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून गोल्डन अवर मध्ये उपचार आणि बचाव कार्य संबंधीचे धडे भूपेंद्र मिश्रा यांनी दिले. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या संसाधनातून, तंत्रशुद्धरित्या, तत्काळ आणि सहजपणे प्रथम उपचार कसे करता येतात, याबद्दल प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. अपघातात चुकीच्या पद्धतीने जखमींना हाताळल्याने गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात हे वेगवेगळ्या पद्धतीने शिबिरार्थींना समजावून देत तसे प्रकार टाळण्याकरिता योग्य उपाय सुचविले. रेसिलियेंट फाऊंडेशने आयोजित केलेल्या शिबीराचे संदर्भात अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या गुरुनाथ साठेलकर यांनी प्रास्ताविक केले तर पोलिस वाहतूक विभागाकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी यांनी आभार व्यक्त केले. रेसिलियेंट फाऊंडेशन, महाराष्ट्र पोलीस, वाहतूक पोलिस यंत्रणा आणि प्र...

महिला रिक्षा चालक प्रतिक्षा प्रतिक्षा वाघमारे यांनी सूरु केलेल्या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक ..

खोपोली ( किशोर साळुंके ) खोपोली शहरातीत पहिल्या महिला रिक्षा चालक प्रतिक्षा वाघमारे आपल्या कुटुंबीयांना रिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक बळ देत आहेत.आपले कुटुंब सांभाळत असताना मात्र रिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून सामाजिक कार्यातही सक्रिय असतात.प्रतिक्षा वाघमारे यांनी रिक्षा व्यवसाय सुरु केल्याने त्यांची प्रेरणा घेत आज शहरात अनेक महिलांनीही रिक्षा व्यवसाय सुरु करुन स्वाभिमानाने आत्मनिर्भर होताना दिसून येत आहेत .जादा पैसे देणारे भाडे नाकारुन जेष्ठ नागरिकांसाठी व कुठे अपघात घडला असेल अथवा रात्री अपरात्री महिलांच्या प्रसुतीसाठी बोलावणे आलेच तर त्यांना प्रथम प्राधान्य देत वरिल अडचणीत असणार्यांना तात्काळ सेवा देण्यासाठी प्रतिक्षा वाघमारे नेहेमी तत्पर असतात.सद्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरु असुन या विद्यार्थ्यांना वेळेवर परिक्षा केंद्रा पर्यंत पोहोचण्यासाठी कोणतीही अडचण होवू नये यासाठी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सामाजिक बांधिलकी जपत एका अनोख्या सामाजिक उपक्रम सुरु करुन या विद्यार्थ्यांसाठी आपल्या रिक्षाच्या माध्यमातून मोफत सेवा स...