कर्जत: जयेश जाधव
कर्जत तालुक्यातील शिरसे ग्रामपंचायतीच्या सरपंच आरती संदीप भोईर यांचा नामांकित लोकमत प्रिंट मीडिया समूहाने त्यांच्या सरपंचाच्या कारकिर्दीत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना ” लोकमत वुमन अचिवमेंट ” या पुरस्काराने महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, आमदार मंदाताई म्हात्रे, मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर, सिने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर,नवी मुंबई पोलीस आयुक्त अभिजित बांगर यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला .त्यांचा झालेला सन्मान म्हणजे भविष्यात त्यांना गरुड भरारी घेण्यास प्रेरणादायी ठरणार आहे शिरसे ग्रामपंचायतीच्या सरपंच म्हणून थेट नागरिकांमधून निवडून आलेल्या सरपंच आरती संदीप भोईर यांच्या निवडीला अडीच वर्षात आपल्या कामाचा एक वेगळा ठसा उमटविला त्याच्या कार्यामुळे शिरसे ग्रामपंचायतीला २०१८-१९ वर्षात आर आर पाटील (आबा) सुंदर गाव पुरस्कार जाहीर झाला हा पुरस्कार त्यांना १४ फेब्रुवारी २०२०रोजी प्रदान करण्यात आला तर राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य सेवांवर लोकाधारित देखरेख व नियोजन प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल त्यांना 'उत्कृष्ट सरपंच' म्हणून गौरविण्यात आले आहे .याशिवाय कोरोना काळात न डगमगता नागरिकांची सुरक्षा जपत सुरक्षिततेची साधने व शासनाकडून आलेले आदेश पाळत कोरोनावर मात करण्याचा प्रयत्न केला आहे.
आपले घरदार, संसार सांभाळून अनेक महिला वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्यरत असतात त्यांच्या कार्याचा असा सत्कार म्हणजे त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी वेगळेच प्रोत्साहन असून हा पुरस्कार म्हणजे माझ्या ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांचा माझ्यावर असलेला विश्वास आणि त्यांचे आशीर्वाद असल्याचे मत सरपंच आरती संदीप भोईर यांनी व्यक्त केला आहे त्यामुळे सामाजिक ,राजकीय , क्रिडा , सांस्कृतिक क्षेत्रातून मान्यवर मंडळींकडून सरपंच आरती भोईर यांचे अभिनंदन होत आहे
खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे
खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...
Comments
Post a Comment