पळसदारी ग्रामपंचायतीच्या सौ.पुजा प्रताप सुर्वे (राजमाता जिजाऊ फाऊंडेशन )यांना "वुमन अचिवमेंट "पुरस्काराने सन्मानित..
कर्जत /अभिजीत दरेकर :-
सौ पुजा प्रताप सुर्वे यांचा नामांकित लोकमत प्रिंट मीडिया समूहाने त्यांच्या राजमाता जिजाऊ फाऊंडेशनच्या माध्यमातून करण्यात आलेल्या उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल त्यांना ” लोकमत वुमन अचिवमेंट ” या पुरस्काराने महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, आमदार मंदाताई म्हात्रे, मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर, सिने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर,नवी मुंबई पोलीस आयुक्त अभिजित बांगर यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला . त्यांचा झालेला सन्मान म्हणजे त्यांनी 6 जून 2018 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक सोहळा या शुभदिनी राजमाता जिजाऊ फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली. वरिल फाउंडेशनच्या मार्फत विविध शिबीराचे आयोजन करण्यात आले. महिलांच्या सक्षमी करणासाठी सौ.पुजा प्रताप सुर्वे प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतात. सामाजिक ,राजकीय , क्रिडा , सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून सौ पुजा प्रताप सुर्वे यांचे अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Comments
Post a Comment