Skip to main content

खालापुरात ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन : वेध सह्याद्री मार्फत स्तुत्य उपक्रम*

खालापूर : खालापूर शहरातील प्राचीन असलेल्या सोमेश्वर मंदिराच्या परिसरात इतिहासाची साक्ष देणाऱ्या अनेक वास्तू अनेक दिवसांपासून दुर्लक्षित अवस्थेत होत्या. खालापूर तालुक्याला ऐतिहासिक दृष्ट्या वेगळेच महत्त्व असल्याचे आपल्याला पाहायला मिळते, इतिहासातील अनेक घटनांचा साक्षीदार म्हणून आज खालापूराकडे पहिले जाते. अनेक परिसरात आज विविध प्रकारचे ऐतिहासिक अवशेष सापडताना पहायला मिळत आहेत. ऐतिहासिक घटनांची साक्ष देणाऱ्या वास्तू जतन करणे हे आपले कर्तव्य असून पुढील पीढीसाठी या अवशेषांचे जतन होणे गरजेचे असल्याची संकल्पना घेत वेध सह्याद्री तर्फे खालापूरत सोमेश्वर मंदीर परिसरात संवर्धन मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. मोहिमे दरम्यान मातीत गाडले गेलेल्या समाधी शिळा, नंदी यांना जमिनीतून बाहेर काढत मोकळे करून स्वच्छता करण्यात आली तसेच शिळा व वीरगळ यांची स्वच्छता करण्यात आली. विरगळीला इतिहास महत्वाचे स्थान असून जो वीरपुरूष जमीन, पशु अथवा आपली स्त्री यांच्या सौरक्षणासाठी लढत असत त्यांच्या मृत्यू नंतर वीरगळ बनवण्यात येत होती. या विरघळी खालापूर परिसरात सापडत आहेत या वरून ऐतिहासिक दृष्ट्या आपल्या परीसराचे महत्व लक्षात येते. मोहिमे दरम्यान स्थानिक रहिवासी व मंदिर परिसराची देखरेख करणारे डॉ. आठवले तसेच इतिहास अभ्यासक सागर सुर्वे यांचे मोलाचे सहकार्य लाभले मोहीम यशस्वी करण्यासाठी वेध सह्याद्रीच्या सर्व सदस्यांनी यावेळी मेहनत घेत पुन्हा एकदा इतिहास जिवंत करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मंदिर परिसरात अजूनही काही अवशेष असून विष्णू, गणपती तसेच प्राचीन देवांच्या मुर्त्या सुद्धा दुर्लक्षित आहेत हे सर्व अवशेष संवर्धन होई पर्यंत मोहीम सुरू राहणार असल्याचे वेध सह्याद्री मार्फत सांगण्यात आले आहे.https://youtu.be/aKtoPRjY348 उपस्थित डॉ.आठवले व इतिहास अभ्यासक सागर सुर्वे यांनी वेध सह्याद्री तर्फे घेण्यात आलेल्या उपक्रमाला शुभेच्छा देत सहभागी सदस्यांचे कौतुक केले मोहिमेत मोहीम प्रमुख म्हणून प्रफुल्ल किलांजे यांनी उत्तम रित्या नियोजन केल्याचे पहायला मिळाले

Comments

Popular posts from this blog

खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे

खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...

रेसिलियेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून एक्स्प्रेस वेवर प्रथमोपचार प्रशिक्षण शिबिराचे आयोजन.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर होणाऱ्या अपघातात मदत करणारे पळस्पे आणि बोरघाट पोलिस विभागाचे अधिकारी व कर्मचारी, रस्त्यांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, टोल प्लाझा मधले आय. आर. बी. चे कर्मचारी व महामार्गावर दुरुस्ती काम करणाऱ्या कामगाराना रेसिलियेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून गोल्डन अवर मध्ये उपचार आणि बचाव कार्य संबंधीचे धडे भूपेंद्र मिश्रा यांनी दिले. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या संसाधनातून, तंत्रशुद्धरित्या, तत्काळ आणि सहजपणे प्रथम उपचार कसे करता येतात, याबद्दल प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. अपघातात चुकीच्या पद्धतीने जखमींना हाताळल्याने गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात हे वेगवेगळ्या पद्धतीने शिबिरार्थींना समजावून देत तसे प्रकार टाळण्याकरिता योग्य उपाय सुचविले. रेसिलियेंट फाऊंडेशने आयोजित केलेल्या शिबीराचे संदर्भात अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या गुरुनाथ साठेलकर यांनी प्रास्ताविक केले तर पोलिस वाहतूक विभागाकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी यांनी आभार व्यक्त केले. रेसिलियेंट फाऊंडेशन, महाराष्ट्र पोलीस, वाहतूक पोलिस यंत्रणा आणि प्र...

महिला रिक्षा चालक प्रतिक्षा प्रतिक्षा वाघमारे यांनी सूरु केलेल्या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक ..

खोपोली ( किशोर साळुंके ) खोपोली शहरातीत पहिल्या महिला रिक्षा चालक प्रतिक्षा वाघमारे आपल्या कुटुंबीयांना रिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक बळ देत आहेत.आपले कुटुंब सांभाळत असताना मात्र रिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून सामाजिक कार्यातही सक्रिय असतात.प्रतिक्षा वाघमारे यांनी रिक्षा व्यवसाय सुरु केल्याने त्यांची प्रेरणा घेत आज शहरात अनेक महिलांनीही रिक्षा व्यवसाय सुरु करुन स्वाभिमानाने आत्मनिर्भर होताना दिसून येत आहेत .जादा पैसे देणारे भाडे नाकारुन जेष्ठ नागरिकांसाठी व कुठे अपघात घडला असेल अथवा रात्री अपरात्री महिलांच्या प्रसुतीसाठी बोलावणे आलेच तर त्यांना प्रथम प्राधान्य देत वरिल अडचणीत असणार्यांना तात्काळ सेवा देण्यासाठी प्रतिक्षा वाघमारे नेहेमी तत्पर असतात.सद्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरु असुन या विद्यार्थ्यांना वेळेवर परिक्षा केंद्रा पर्यंत पोहोचण्यासाठी कोणतीही अडचण होवू नये यासाठी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सामाजिक बांधिलकी जपत एका अनोख्या सामाजिक उपक्रम सुरु करुन या विद्यार्थ्यांसाठी आपल्या रिक्षाच्या माध्यमातून मोफत सेवा स...