खोपोली -(किशोर साळुंके)- खोपोली पोलीस ठाणे अंतर्गत शीळफाटा येथे रात्री गस्तीवर असणाऱ्या पोलिसांनी एका चारचाकी वाहनाचा संशय आल्याने त्या वाहनातील इसमांची चौकशी केली असता एकूण सहा इसमांपैकी पाच जणांनी एकाचे अपहरण करून खंडणी मागितल्याचे उघड होताच त्या पाच जणांच्या मुसक्या आवळून अटक करून अपहरण कर्त्याची सुटका करण्यात आली.
खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल दिनांक ३०सप्टेंबर रोजी रात्री खोपोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर व पोलीस अंमलदार स्वागत तांबे आणि राम मासाळ हे शिळफाटा येथे गस्त घालत असताना MH-04-CT-2597 क्रमांकाची अल्टो कार आली असता तिच्या मागील नंबर प्लेट वर चिक्खल लावला असल्याने पोलिसांना संशय आला व त्यांनी आतील इसमांची चौकशी केली असता त्या गाडीत सहा इसम होते. सुरुवातीला ते उडवा उडवीची उत्तरे देत होते. पण त्यातील एकाने पोलीस अधिकाऱ्यांना 'मला वाचवा ' अशी विनंती केली असता पोलीस सतर्क झाले आणि त्या सर्वांना खोपोली पोलीस ठाण्यात आणून सखोल चौकशी केली असता यातील पाच जण,वामन मारुती शिंदे (३९), योगेंद्र प्रसाद (२५), दिलीप पासवान (३२), धुरपचंद्र यादव (33), संदीप सोनावणे (३५)सर्व राहणार अंबरनाथ, यांनी पुणे जिल्ह्यातील मुळशी येथिल दिगंबर इंदलसिंग चितोडिया याचे अपहरण करून त्यास दोन दिवस अपहरण करून अंबरनाथ येथे डांबून ठेवुन त्याच्या घरचांकडे २५,००,०००रुपये मागणी केली असल्याचे समजले.
खोपोली पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर या बाबत पुण्यातील हिंजवडी पोलीस ठाणे येथे गु.र. क्र.७३८/२०२१, भादवीसंक.३६४(अ),३८६या प्रमाणे अपहरण व खंडणी मागणे या गुन्ह्याप्रमाणे नोंद केल्याची माहिती मिळाली. सदर पोलिसांनी खोपोली पोलीस ठाण्यात येऊन सदर आरोपिंचा ताबा घेऊन अपहरण झालेल्या तरुणाला सुखरूप ताब्यात दिले आणि खोपोली पोलिसांचे खास अभिनंदन केले.
एका अपहरणं झालेल्या तरुणाचा जीव वाचवणाऱ्या खोपोली पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर, पोलीस अंमलदार राम मासाळ,स्वागत तांबे यांचे रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी खास अभिनंदन केले असून त्यांना योग्य ते पारितोषिक देण्याचे आयोजन केले असल्याचे प्रतिपादन आजच्या झालेल्या पत्रकार परिषदेत खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी केले.
खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे
खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...
Comments
Post a Comment