खोपोली :-मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर किलोमीटर 18.900 वर गाडीला भीषण आग लागली. या अपघातात जळलेली गाडी साधारण 12 वाजताच्या दरम्यान 18.900 किलोमीटरला पुणे लेनवर शोल्डरला उभी होती. नाईट पेट्रोलिंग करणाऱ्या आय आर बी च्या टीमने तेथे उतरून पाहणी केली. त्यावेळीं गाडीत कोणी आढळले नाही. त्यांनी सेफ्टी कोन लावले, गाडीची नोंद घेतली आणि ते पूढे निघून गेले. मात्र काही वेळानंतर त्याच गाडीला आग लागल्याचे समजले. लागलीच फायर ब्रिगेड खोपोलीची टीम घटनास्थळी दाखल झाली, देवदूत यंत्रणे सोबत सिडको, रिलायन्स आणि आय आर बी च्या फायर ब्रिगेडने आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात विविध पप्रकारच्या वस्तू, सौदर्य प्रसाधने, अगरबत्ती, वायर, इलेक्ट्रिकल साहित्य खच्चुन भरले होते. बऱ्याच प्रयत्नांती आग नियंत्रणात आलेली असताना केबिन मधे एक मृतदेह पुर्ण जळलेल्या स्थितीत दिसून आला. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे विजय भोसले, गुरूनाथ साठेलकर, अमित गुजरे, यासिन शेख यांनी यात मदत केली. मृतदेह बाहेर काढून चौक रुग्णालयात शविच्छेदनासाठी ठेवण्यात आला.
पळस्पे वाहतूक पोलीस, रसायनी बनपोलीस स्टेशन, लोकमान्य हॉस्पिटल, डेल्टा फोर्सचे कर्मचारी यांनी मदतकार्यात भाग घेतला.
गाडीच्या नंबर वरुन मिळालेल्या डीटेल्स नुसार केलेल्या फोन वरुन प्रतिउत्तर न मिळाल्याने मृताची काहीही माहिती मिळाली नाही.
काही वेळासाठी पुणे कडे जाणारी वाहतूक बाधीत झाली होती.
खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे
खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...
Comments
Post a Comment