खोपोली --(किशोर साळुंके ) जनसामान्यांच्या न्याय हक्कसाठी आहोरात्र झटणारे उद्देश गणेश शेंडगे यांची
शिवशाही व्यापारी संघ वडाळा विधानसभा अध्यक्ष पदी संस्थापक/अध्यक्ष युवराज दाखले यांनी शेकडो कार्यकर्ते व पदाधीकारी यांच्या उपस्थितीत नियुक्ती केली.
नवनिर्वाचित मुंबई वडाळा विधानसभा अध्यक्ष उद्देश शेंडगे यांनी सर्वसामान्य व्यापारी वर्गाच्या पाठीशी खंभीरपणे उभे राहून जनतेची प्रामाणिकपणे सेवा करण्यासाठी शिवशाही व्यापारी संघ मुंबई अध्यक्ष संतोष शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सदैव कटिबध्द राहण्याच्या सूचना दाखले यांनी शेंडगे यांना देऊन पुढील सामाजिक कार्यासाठी यावेळी शुभेच्छा दिल्या...
खोपोलीमध्ये डाँ.आंबेडकर संस्कार केंद्राच्या जागेत अतिक्रमण .. आर.पी.आय .पक्षाकडून कारवाई करण्याची मागणी .. त्वरित कारवाई न झाल्यास तिव्र आंदोलनाचा दिला इशारा .
. खोपोली -(किशोर साळुंके ) खोपोली शहरातील यशवंतनगर येथे भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर संस्कार केंद्राच्या जागे समोर एका कुटुंबाने जाणिवपूर्वक अनाधिकृतपणे बांधकाम करण्याचा घाट घातल्याने सदर बांधकाम करणार्यांवर कारवाई करण्याची मागणी रिपब्लीकन पार्टी आँफ इंडिया पक्षाच्या वतीने खोपोली पोलीस ठाण्यात दि.११ /०३/ २०२२ रोजी करण्यात आली आहे.खोपोली नगरपरिषद हद्दितील यशवंतनगर शिळफाटा येथे राजगीरी बुद्ध विहाराची इमारत होती त्या जागेत खोपोली नगरपरिषदेच्या वतीने भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर संस्कार केंद्रासाठी जिल्हा नियोजन आधिकारी अलिबाग यांच्याकडून निधी व तांत्रिक मंजूरी मिळवून रीतसर काम सुरु झाले आहे.साधारण पन्नास लक्ष रुपये रुपये किमतीचे हे बांधकाम असून खोपोली नगरपरिषदेकडून काम सुरु आहे.परंतू सदर ठिकाणी राहणारे गोसावी परिवाराकडून सदर जागेत अनधिकृत बांधकाम करण्याच्या उद्धेशाने त्यांनी सदर जागेसमोरील स्वताच्या घराची भिंत तोडून तेथे दरवाजा काढून बेकायदेशीपणे वाढीव बांधकाम करण्याचा प्रयत्न त्यांनी जाणीवपूर्वक संस्कार केंद्रा लगतच्या जागेसमोरील वहिवाटीचा रस्ता नसतानाही स्वताच्या घराची भिंत त
अभिनंदन
ReplyDelete