खोपोलीतील दत्त मंदिरातील पुलाचा लोकार्पण सोहळा संपन्न अनिल सानप यांनी स्वनियोजनाने बांधला लोखंडी पुल
खोपोली -(बातमीदार)-
खोपोली शहरातील नामकींत झेनिथ कारखान्यातील कामगार वर्गानी व झेनिथ परिसरातील भक्तांनी 1970 साली सेवागिरी आश्रम दत्त मंदीराची निर्मिती केली. या मंदिराची निर्मिती होत असताना मंदिरात जाण्यासाठी नाल्यावर पुल बांधण्यात आला होता, परंतु गेल्या अनेक वर्षात या पुलाची दुरुस्ती न झाल्याने हा पुल धोकादायक अवस्थेत उभा होता. या पुलाची दुरुस्ती होणे गरजेचे असताना ही समस्या ओळखून खोपोली शिवसेना शहरप्रमुख अनिल सानप यांनी सामाजिक बांधिलकी जपत स्वखर्चाने आजोबा - आजी - मावशी स्मरणार्थ लोखंडी पुल बांधल्याने या पुलाचे उघ्दाटन 2 अॉक्टोबर रोजी जेष्ठ मंडळीच्या हस्ते पार पडला असून अनिल सानप याच्या सामाजिक बांधिलकीचे सर्व स्तरावरून कौतुक केले आहे.
खोपोली शहरातील झेनिथ परिसर हा निसर्ग सौदंर्याने नटलेला परिसर असून या परिसरात घनदाट झाडी असल्याने येथील वातावरणात सर्वाना आल्हाददायक वाटत असताना याच परिसरात झेनिथ कामगार वर्ग व भक्त गणांनी 1970 साली सेवागिरी आश्रम दत्त मंदीर बांधले, हे मंदीर बांधत असताना भक्तांची जे - जा करण्यासाठी गैरसोय होऊ नये म्हणून नाल्यावर पुल बांधण्यात आला होता. परंतु निर्मितीपासून पुलाची दुरुस्ती न झाल्याने पुल पूर्णपणे मोडकलीस आला होता. हा पुल भक्तांसह पर्यटकांना धोक्याची घंटा देत असताना या पुलाची नादुरुस्त अवस्था लक्षात घेत खोपोली शिवसेना शहरप्रमुख अनिल सानप यांनी पुढाकार घेत व सामाजिक बांधिलकी जपण्याच्या हेतूने आजोबा रघुनाथ तात्याबा सानप, आजी रमाबाई रघुनाथ सानप, मावशी सुमन काशिनाथ आंधले याच्या स्मरणार्थ स्वखर्चाने लोखंडी पुल बांधून दिल्याने या पुलाचे उघ्दाटन 2 आक्टोबर रोजी जेष्ठ मंडळी हस्ते पार पडला व सदर पुलाचे लोकार्पण झाल्यानंतर पत्रकारांच्या वतीने सचिन यादव यांनी श्रीफळ वाढवून अनिल सानप यांना शुभेच्छा दिल्या..
सर्वानी अनिल सानप यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करीत सानप याना पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी उपशहरप्रमुख शिवसेना अनिल पुंडलिक सानप, अनंत गायकर, अनिलकुमार रानडे, बाळु इमानदार, दत्तात्रेय दळवी, संजय म्हात्रे, जयवंत वाघ, मिलिंद भोईर, सिध्देश सुळे, पुंडलिक सानप, मुंकुद बेंबडे, कान्हु निरघुडे, मंगळ उघडे, निलेश मोडवे, भाऊ ढुमणे, वसंत जोशी, संतोष जाधव, सुदाम उघडे, वनाजी जाधव, गोविंद मेंगाळ, पांडुरंग हिंदोळे, चंद्रकांत जाधव, अजय जाधव, दिपक दोरे, सागर उघडे, चंद्रकांत उघडे, भाजपा सोशिल मिडीयाचे राहूल जाधव, सरचिटणीस गोपाळ बावस्कर आदीप्रमुखासह झेनिथ परिसरातील ग्रामस्थ, श्री दत्त मंदीराचे सदस्य व भक्तगण उपस्थित होते.
Comments
Post a Comment