खोपोली -(किशोर साळुंके):
खोपोली नगरीतील सिद्धार्थनगर मध्ये सालाबाद प्रमाणे कोजागिरी पौर्णिमा संपन्न झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खोपोली शहर अध्यक्षा सुवर्णा संतोष मोरे यांच्या माध्यमातून संगीत खुर्ची, टाळीगरबा याचे आयोजन केले होते.
दरवर्षी सिद्धार्थनगर मधिल ग्रामस्थ मोठया उत्साहात साजरा करतात. याही वर्षी हा सण साजरा करतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खोपोली शहर अध्यक्षा सुवर्णा संतोष मोरे यांनी स्पर्धात्मक नियोजन करून लहान मुले, तरुणी व महिलांसाठी संगीत खुर्चीचे आयोजन करून विजेत्यांना आकर्षक बक्षीस देण्यात आले. यानंतर टाळीगरबा खेळून पारंपारिक पद्धतीने चंद्र दर्शन घेऊन दुध वितरित करण्यात आले.
खोपोलीमध्ये डाँ.आंबेडकर संस्कार केंद्राच्या जागेत अतिक्रमण .. आर.पी.आय .पक्षाकडून कारवाई करण्याची मागणी .. त्वरित कारवाई न झाल्यास तिव्र आंदोलनाचा दिला इशारा .
. खोपोली -(किशोर साळुंके ) खोपोली शहरातील यशवंतनगर येथे भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर संस्कार केंद्राच्या जागे समोर एका कुटुंबाने जाणिवपूर्वक अनाधिकृतपणे बांधकाम करण्याचा घाट घातल्याने सदर बांधकाम करणार्यांवर कारवाई करण्याची मागणी रिपब्लीकन पार्टी आँफ इंडिया पक्षाच्या वतीने खोपोली पोलीस ठाण्यात दि.११ /०३/ २०२२ रोजी करण्यात आली आहे.खोपोली नगरपरिषद हद्दितील यशवंतनगर शिळफाटा येथे राजगीरी बुद्ध विहाराची इमारत होती त्या जागेत खोपोली नगरपरिषदेच्या वतीने भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर संस्कार केंद्रासाठी जिल्हा नियोजन आधिकारी अलिबाग यांच्याकडून निधी व तांत्रिक मंजूरी मिळवून रीतसर काम सुरु झाले आहे.साधारण पन्नास लक्ष रुपये रुपये किमतीचे हे बांधकाम असून खोपोली नगरपरिषदेकडून काम सुरु आहे.परंतू सदर ठिकाणी राहणारे गोसावी परिवाराकडून सदर जागेत अनधिकृत बांधकाम करण्याच्या उद्धेशाने त्यांनी सदर जागेसमोरील स्वताच्या घराची भिंत तोडून तेथे दरवाजा काढून बेकायदेशीपणे वाढीव बांधकाम करण्याचा प्रयत्न त्यांनी जाणीवपूर्वक संस्कार केंद्रा लगतच्या जागेसमोरील वहिवाटीचा रस्ता नसतानाही स्वताच्या घराची भिंत त
Comments
Post a Comment