खालापूर तालुक्यातील नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्यात महत्त्वाची समजली जाणारी *उत्तम स्टील - डोणवत* ह्या कंपनीतील कामगार आज पासून काम बंद आंदोलन करून संपावर गेले आहेत.
गेली अनेक वर्षे *उत्तम स्टील - डोणवत* व्यवस्थापनाने कर्मचारी आणि कामगारांना संयुक्तिक पगारवाढ न दिल्याने नाराजी होती. कंपनी व्यवस्थापनाला वारंवार सूचना आणि विनंती करूनही कोणता फरक न पडल्याने आता हे सर्वांनी संपाचे हत्यार उचलल्याचे समजते.
*उत्तम स्टील - डोणवत* येथे काम करणारे कायमस्वरूपी साधारपणे तीनशे पेक्षा जास्त कामगार आणि कर्मचारी तसेच इतर कर्मचारी कामबंद आंदोलनाच्या माध्यमातून आपला विरोध दर्शवत आहेत असे चित्र आज सकाळपासून दिसत आहे.
खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे
खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...
Comments
Post a Comment