खोपोली -(किशोर साळुंके ) :
खोपोली परिसरामध्ये नगर परिषदेच्या वतीने सर्वसामान्य नागरिकांच्या दळणवळणासाठी सिटी बसचे नियोजन करण्यात आलेले आहे.परंतु कोरोना च्या पार्श्वभूमीवरती खबरदारी म्हणून सिटी बस बंद करण्यात आली होती, कोरोना आटोक्यात आल्यानंतर देखील आज पर्यंत खोपोली सिटी बस अद्याप चालू करण्यात आलेले नाही. ती सुरु करण्याची मागणीआर पी आय ने खोनपा कडे केली आहे.
दुसरीकडे संपूर्ण महाराष्ट्र मध्ये रेल्वे,विमान,बस सेवा सुरू झालेले आहे तरी सर्वसामान्य नागरिकांच्या मागणी वरून खोपोली शहर सिटी बस 15 दिवसाच्या आत चालू करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात यावा अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मातंग आघाडी व शिवशाही व्यापारी संघ, तथ्य योद्धा, सामाजिक संघटना, आजी-माजी नगरसेवक, आजी-माजी समाजसेवक पदाधिकारी तसेच सर्वसामान्य नागरिकांना सोबत घेऊन खोपोली नगर परिषदेवर जन आंदोलन उभारण्यात येईल,असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट कोकण प्रदेशाध्यक्ष मातंग आघाडी तुषार कांबळे यांनी खोपोली नगर परिषदेला निवेदनाद्वारे दिला आहे.
खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे
खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...
Comments
Post a Comment