खोपोली--(किशोर साळुंके )
आदिवासी वाडीतील युवावर्ग उन्नतीच्या दिशेने होणाऱ्या प्रवाह धारेपासून दुर्लक्षित राहिल्याने त्यांचे होणारे नुकसान रोखण्यासाठी किंबहुना भावी पिढीचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने, लायन्स क्लबने "ऑक्टोबर सर्विस विक" या माध्यमातून २ ते ९ ऑक्टोबर 2021 या कालावधीत "आदिवासी वाडी दत्तक योजना" राबवली आहे.
आदिवासी वाडी दत्तक योजनेत चेंबूर, वाशी, शहापूर, पेण आणि खोपोली लायन्स क्लबचा समावेश असून त्यांनी जांबरूंग, आत्करगाव, होनाड, शहापूर आणि सावरसर्ई या आदिवासी वाड्याना दत्तक घेतले आहे. लायन्स क्लब ऑफ खोपोलीच्या डॉ. नरहरी किसन धोटे सभागृहात दत्तक घेतलेंल्या आदिवासी वाड्यातील युवकांसाठी उद्योग, व्यवसाय, नोकरी आणि शैक्षणिक मार्गदर्शन करण्यासाठी दिनांक 3 ऑक्टोबर रोजी अभ्यास शिबिराचे आयोजन केले होते. महाराष्ट्रातील मान्यवर अशा विचारवंत आणि अभ्यासक विभूतीनी यावेळी युवकांना मार्गदर्शन केले. या अभ्यास वर्गातील युवकांना परिस्थितीनुरूप सर्वतोपरी सहकार्य करण्याचा मानस लायन्स क्लब ऑफ खोपोलीचे अध्यक्ष महेश राठी यांनी बोलून दाखवला.
लायन्स क्लब खोपोलीच्या सेक्रेटरी शिल्पा मोदी, खजिनदार अल्पेश शहा, आणि इतर सर्व सदस्यांनी हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी मेहनत घेतली अशी माहिती लायन दिलीप पोरवाल यांनी दिली.
खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे
खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...
Comments
Post a Comment