खोपोली :(किशोर साळुंके) : खोपोली पोलीस ठाणे अंतर्गत उभारण्यात आलेल्या शाहिद श्री. अशोक कामटे बॅडमिंटन हॉल चे उदघाटन रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या हस्ते करण्यात आले.
पोलीस कर्मचारी सतत कामात गर्क असल्याने त्यांचे आपल्या आरोग्याकडे लक्ष राहत नाही, ही बाब लक्षात घेऊन खोपोली पोलीस ठाण्याच्या आवारात बॅडमिंटन हॉल उभारण्यात आले व त्यास शहीद श्री अशोक कामटे बॅडमिंटन हॉल नाव देऊन त्यांच्या बलिदानास सन्मानित करण्यात आले.
आज रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या हस्ते व अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे , डीवायएसपी खालापूर शुक्ला यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उदघाटन व लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यासमयी पोलिसांच्या नेत्र तपासणी शिबिराचेही आयोजन केले होते.
खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी सर्वांचे स्वागत करून आभार मानले.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर होणाऱ्या अपघातात मदत करणारे पळस्पे आणि बोरघाट पोलिस विभागाचे अधिकारी व कर्मचारी, रस्त्यांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, टोल प्लाझा मधले आय. आर. बी. चे कर्मचारी व महामार्गावर दुरुस्ती काम करणाऱ्या कामगाराना रेसिलियेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून गोल्डन अवर मध्ये उपचार आणि बचाव कार्य संबंधीचे धडे भूपेंद्र मिश्रा यांनी दिले. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या संसाधनातून, तंत्रशुद्धरित्या, तत्काळ आणि सहजपणे प्रथम उपचार कसे करता येतात, याबद्दल प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. अपघातात चुकीच्या पद्धतीने जखमींना हाताळल्याने गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात हे वेगवेगळ्या पद्धतीने शिबिरार्थींना समजावून देत तसे प्रकार टाळण्याकरिता योग्य उपाय सुचविले. रेसिलियेंट फाऊंडेशने आयोजित केलेल्या शिबीराचे संदर्भात अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या गुरुनाथ साठेलकर यांनी प्रास्ताविक केले तर पोलिस वाहतूक विभागाकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी यांनी आभार व्यक्त केले. रेसिलियेंट फाऊंडेशन, महाराष्ट्र पोलीस, वाहतूक पोलिस यंत्रणा आणि प्र...
Comments
Post a Comment