कर्जत :किरवली ,सावरगाव वाडी व आशाने ठाकुरवाडी येथील आदिवासी बांधवांसाठी २०० कोवँक्सिनचे मोफत लसीकरण .. किरवली ग्रामपंचायतीच्या कार्यसम्राट समजल्या जाणार्या विद्यमान सदस्या मोनिका निलेश बडेकर यांचे मानले आभार तर स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक..
.
कर्जत :-( किशोर साळुंके )-- लसीकरण करुन घेण्यासाठी आँनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी महागडा स्मार्टफोन त्यासाठी लागणारा महागडा मोबाईल डाटा सारखे खर्चीक बाब व रजिस्ट्रेशन करण्यासाठी किचकट असलेल्या प्रक्रियेमुळे आदिवासी बांधवांनी पाट फिरवत असल्याची गंभीर बाब किरवली गृप ग्रामपंचायतीच्या कार्यसम्राट समजल्या जाणर्या विद्यमान सदस्या तथा सामाजिक कार्यकर्या सौ. मोनिका निलेश बडेकर यांच्या लक्षात येताच त्यांनी आपले पती सामाजिक कार्यकर्ते , दानशूर व्यक्तिमत्व समजले जाणारे निलेश बडेकर यांच्या मदतीने पूढाकार घेत किरवली,सावरगाव वाडी व आशाने ठाकुरवाडी येथील लसीकरणा पासून वंचिन असणार्या आदिवासी बांधवांसाठी तब्बल २०० कोवँक्सिन डोस उपलब्ध करुन देत सामाजिक बांधिलकी जपली . कोरोनाच्या तिसर्या लाटेचा धोका व यांच्या आरोग्यास कोरोनाचा धोका होवू नये या करता वरिल आदिवासी वाड्यांमधील आदिवासी बांधवांना किरवली ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्या सौ.मोनिका निलेश बडेकर यांच्या पूढाकारातून २०० कोवँक्सिन डोस उपलब्ध करुन दिल्याबद्दल वरिल वाडीतील नागरिकांनी सौ.मोनिका बडेकर यांचे मानले आभार. वरिल स्तुत्य उपक्रमाचेही सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.यामधे पहिला डोस महिला व पुरुष यांचे लसीकरण करण्यात आले.यावेळी डाँक्टर मनोज बनसोडे कर्जत पोलीस स्टेशनचे पी.आय . सुवर्णा पत्की ,किरवली ग्रामपंचायतीचे सदस्य,मित्रपरिवार ,व मोठ्या संखेने विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थितीत होते.
Comments
Post a Comment