कर्जत -(संकेत घेवारे ) -
संपूर्ण भारतातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सर्व मराठा बांधवानी एकत्र येण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी सुरु केलेल्या जनसंपर्क यात्रेचे जंगी स्वागत पळसदरी येथे करण्यात आले.
सर्व मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी संपूर्ण देशातच नव्हे तर परराष्ट्रातील मराठ्यांनी आंदोलने केली. शेकडो मोर्चे निघाले, अनेकांनी आत्म बलिदान केले, पण आरक्षण मिळाले नाही.
पुन्हा सर्व समाजाने एकत्र येऊन आरक्षणाची मागणी रेटून धरण्यासाठी आणि सरकारने हे आरक्षण मंजूर करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज यांनी जनसंपर्क अभियान यात्रा सुरु केली असून रायगड जिल्यातील कर्जत तालुक्यातील पळसदरी येथे या यात्रेचे तुतारीच्या गजारात जंगी स्वागत करण्यात आले.
कर्जत पळसदरी येथील श्री स्वामी समर्थ मठात छत्रपती संभाजी महाराज यांचे मठाच्या वतीने मठाधीपती यांचे चिरंजीव तथा महाराष्ट्र टाईम्स 25NEWS चे सह संपादक अभिजित दरेकर यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले..
खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे
खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...
Comments
Post a Comment