अखेर खोपोलीकरांची प्रतीक्षा संपली डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केंद्रीयमंत्र्यांच्या हस्ते होणार
......खोपोली.... संपादकीय....
----------------------------------------
खोपोली नगर परिषद यांच्या वतीने गेल्या साधारण ३०वर्षांपूर्वी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवीला होता. सदर पुतळा अनेक वर्ष झाल्याने जीर्ण झाला होता. तो पुन्हा नव्याने उभारावा ही समस्त खोपोली करांची मागणी होती. सदर पुतळ्याचे जीर्ण झालेले अवशेष अथवा खपले पडत असल्याची प्रत्यक्ष दर्शी बातमी पत्रकार सचिन यादव यांनी काही वर्षांपूर्वी ६ डिसेंबर रोजी समोर आणून साप्ताहिक जनता मंच मध्ये छापून आणली. यानंतर सर्व जिल्ह्यात खलबळ माजली आणि खोपोली नगर परिषदेचे नगराध्यक्ष दत्तात्रय मसूरकर यांच्या काळात ठराव करून नव्याने पुतळा बसविण्याचा सर्वानुमते ठराव करण्यात आला.
आज सर्वांच्या प्रयत्नाला यश आले असून सध्याच्या खो. न. पा. नगराध्यक्षा सुमन मोहन औसरमल आणि सर्व नगरसेवक तसेच सामाजिक कार्यकर्ते, विविध पक्षीय नेतेगन, शिव /फुले /शाहू /आंबेडकर प्रेमी, विचारवंत यांच्या प्रयत्नानी आज नव्याने भव्य दिव्य असा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात आला असून उद्या 4ऑक्टोबर रोजी सन्माननीय केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण होणार आहे.
Comments
Post a Comment