खोपोली.. (किशोर साळुंके )
28 सप्टेंबर हा जागतिक रेबीज निवरण दिन आणि 4 ऑक्टोबर हा जागतिक प्राणी दिन या दोन्ही महत्त्वाच्या दिवसांचे औचित्य साधून व्हीं पी डब्ल्यू ए, श्रीकृपा एक्वेरियम, covid-19 ॲनिमल ग्रुप - खोपोली, आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था - रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने खोपोली शहरातील भटक्या कुत्र्यांना रेबीज प्रतिबंधक लस निशुल्क देण्याची मोहीम राबविली होती.
साधारणपणे तीन दिवस सुरू असलेल्या या मोहिमेत सर्व संस्थांच्या सोबत शिवदुर्ग मित्र मंडळ - लोणावळा यांचाही सहभाग होता. खोपोली शहरातील विविध भागात प्रत्यक्ष जाऊन जवळपास दोनशेच्या दरम्यान भटक्या कुत्र्यांना लस देऊन रेबीज मुक्त केले आहे.
या मोहिमेसाठी हिमालया आणि डूरल्स या ऍनिमल फूड निर्माण करणाऱ्या कंपन्यांनी डॉग फुड देऊन सहकार्य केले.
खोपोली शहरात या मोहिमेला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, ज्येष्ठ नगरसेवक मोहन औसरमल, किशोर पानसरे यांनी शुभेच्छा दिल्या. खोपोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिरीष पवार आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश अस्वर यांनी या मोहिमेत प्रत्यक्ष सहभाग घेतला होता.
आगामी काळात याहीपेक्षा मोठ्या प्रमाणात ही मोहीम राबवली जाईल असा विश्वास मोहिमेचे मार्गदर्शक डॉक्टर राहुल मुळेकर यांनी दिला आहे.
खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे
खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...
Comments
Post a Comment