खोपोली प्रतिनिधी (किशोर साळुंके )
खालापूर तालुक्यातील वडवळ गावचे सुपुत्र तथा रायगड भूषण जगदीश मरागजे यांच्या हस्ते वडवळ ग्रामपंचायत हद्दीतील पथदीप योजनेचे भूमिपूजन संपन्न झाले.
वडवळ ग्रामपंचायत क्षेत्रात येणार्या वासोटे, ताकवली, कुसावडे, कसबे तांबी, धवली अशा एकूण पाच गावांचे रस्ते प्रकाशमान करण्याच्या उद्दीष्टाने ही योजना राबवली जाणार आहे.
वडवळ ग्रामपंचायतीने भूमिपूजनाच्या निमीत्ताने आयोजित केलेल्या छोटेखानी समारंभात जगदीश मरागजे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्याच हस्ते योजनेचे भूमिपूजन करण्यात आले. महाराष्ट्राची भाग्यरेखा असलेल्या कोयना धरणाच्या निर्मिती दरम्यान या परीसरात पुनर्वसित झालेल्या कोयना वसाहतीत 1959 नंतर पहिल्यांदाच असा प्रकल्प दृष्टिपथात येणार आहे.
या कार्यक्रमात माजी सरपंच जितेंद्र सकपाळ, अशोक मरागजे, महेंद्र सावंत, अनिल सावंत, श्रीकांत मरागजे, योगेश शिंदे, श्याम सावंत, विलास सावंत, मुख्याध्यापक सुधाकर थळे, त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीचे सरपंच भगवान वाघमारे, उपसरपंच श्वेता कुंभार, सदस्य स्नेहा मरागजे, रमेश गायकवाड, गायत्री सावंत, सुवर्णा शिंदे, सरस्वती सावंत, अनिल मरागजे, प्रमोद सकपाळ, सचिन मोरे, त्याचप्रमाणे ग्रामसेवक प्रमोद पाटील यांनी उपस्थिती दर्शवली होती. याचवेळी कोरोना लसीकरण योजनेतील "कवच कुंडल" योजनेला सर्वतोपरी सहकार्य करण्याचा संकल्प करण्यात आला.
खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे
खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...
Comments
Post a Comment