परभणी, मराठवाडा : - यांच्या नेतृत्वाखाली वन राज्यमंत्री मा.ना. दत्तात्रेय भरणे यांच्याकडे बैठक लावण्या संधर्भात दि.२२/०६/२०२१ रोजी पत्र देण्यात आले होते.त्यानुसार वन राज्यमंत्री मा.ना. दत्तात्रेय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली दि.6/10/2021 रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
वनपाल संवर्गातील ज्या कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ दिला होता, मात्र जे कर्मचारी वित्त विभागाच्या दि.१ एप्रिल २०१० रोजीच्या शासन निर्णयानुसार अटी व शर्तींची पूर्तता करीत नव्हते. त्यांच्याकडून अतिप्रदान रकमेची वसुली करण्यात आली होती.
तसेच मा. आ. गव्हाणे साहेब यांनी १०/२०/३० वर्षाचा तिसरा लाभ लागू करताना शिक्षणाची अट लागू पडत नाही व ज्या कर्मचाऱ्यांच्या अतीप्रधान रकमा चुकीच्या पद्धतीने वसूल केल्याचे निदर्शनास आणून दिले.
या बैठकीस मा.ना.अदिती तटकरे(रायगड,पालकमंत्री)आ. श्री. भरतशेठ गोगावले,माजी आ श्री. विजय गव्हाणे,नागपूरचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्री गुप्ता साहेब, ठाण्याचे मुख्य वनसंरक्षक श्री. एस.व्ही रामाराव, वन विभागाचे उपसचिव श्री. सुनिल पांढरे,श्री आशिष परकर,
वनक्षेत्रपाल श्री.एस.जी.धनावडे, बी.डी.हारपुडे,एस.बी.पाटील,एस.जी.खारकर,एस. यू.माने,एस.जी.म्हात्रे,तोरणे,दाभणे, राठोड उपस्थित होते.
वने राज्यमंत्री श्री.भरणे म्हणाले, १९७६ साली वनपाल म्हणून रूजू झालेल्या कर्मचाऱ्यांना न्याय देणे गरजेचे आहे. त्यांना शासकीय नियमानुसार आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळावयास हवा. अनेक वर्षे सेवा दिल्यानंतर त्यांच्यावर अन्याय होऊ नये आणि मा.उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार संबंधित कर्मचाऱ्यांकडून दिलेल्या रकमेची वसुली करण्यात येऊ नये. तसेच पूर्वी या योजनेअंतर्गत दिलेल्या अतिप्रदान रकमेची जी वसुली केली होती. त्याचा परतावा करण्यात यावा असे निर्देशही राज्यमंत्री श्री. भरणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे
खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...
Comments
Post a Comment