स्वप्निल जाधव यांची नियुक्ती .. शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या पिंपरी-चिंचवड शहरातील ग प्रभाग अध्यक्षपदी स्वप्नील अनिल जाधव यांची निवड जाहीर.
खोपोली प्रतिनिधी-शिवशाही व्यापारी संघ पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सचिन अण्णा लिमकर यांच्या सुचनेने व चिंचवड विधानसभा अध्यक्ष धनराज दाखले यांच्या अनुमोदनाने *स्वप्नील अनिल जाधव* यांची पिंपरी चिंचवड शहरातील ग प्रभाग अध्यक्षपदी निवड मुंबईमधून संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी आज जाहीर केली.
नवनियुक्त ग प्रभाग अध्यक्ष स्वप्नील जाधव यांनी शिवशाही व्यापारी संघ प्रदेश उपाध्यक्ष अनंत काका कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ग प्रभाग अंतर्गत येणाऱ्या सर्व प्रभागांमधील व्यापारी वर्ग, सर्वसामान्य नागरिक,दिव्यांग बांधव, बांधकाम मजूर बांधव यांची सेवा करण्यासाठी सदैव कटिबद्ध राहण्याच्या सूचना दाखले यांनी देऊन पुढील राजकीय सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment