अपघाग्रस्तांच्या मदतीसाठी सामजिक संस्थेचा युवा टीम मेंबर शुभम संतोष कंगळे राज्यस्तरीय बेंच प्रेस स्पर्धेत ब्राँझ मेडल विजेता.
खोपोली --(किशोर साळुंके ) खोपोलीच्या शुभम संतोष कंगळे या युवकाने औरंगाबाद येथे झालेल्या राज्यस्तरीय बेंच प्रेस स्पर्धेत 135 किलो एवढे वजन उचलून ब्राँझ मेडल पटकावले आहे.
मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये पदविका प्राप्त केलेल्या शुभम कंगळे यांने स्पोर्ट्स न्यूट्रिशियनची आणि फिटनेस कोच अशी पदवी प्राप्त केली असून तो गेली पाच वर्षे बेंच प्रेस या क्रीडा प्रकाराचा सराव करत आहे. येत्या काही दिवसात गोवा येथे होणाऱ्या राष्ट्रिय आणि त्यानंतर हॉंगकॉंग येथे होणाऱ्या अंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी त्याचे प्रयत्न आणि सराव सुरू आहे.
शुभमला, मोहनीश राजवाडे यांचे मार्गदर्शन लाभत असून, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पदक प्राप्त करण्यासाठी त्याच्याकडून ते मेहनत करून घेत आहेत. शुभमला मिळालेल्या या यशामुळे त्याचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे.
Comments
Post a Comment