*खोपोली --( किशोर साळुंके ) रायगड जिल्ह्यात होणाऱ्या आगामी रायगड जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायती व ग्रामपंचायती* इत्यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये *शेतकरी कामगार पक्षाची* भूमिका काय असेल, कार्यकर्त्यांनी कोणत्या पद्धतीने तयारीला लागायचे आहे, त्याचप्रमाणे इतर पक्ष पातळीवरच्या धोरणांवर विचार विनिमय करण्याकरता *रविवार दिनांक 17 ऑक्टोंबर 2021 रोजी* खोपोली शहरातील *समर्थ मंगल कार्यालयात शेतकरी कामगार पक्ष - कार्यकर्ता मेळावा* आयोजीत केला आहे.
या आयोजनात *शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील, माजी आमदार धैर्यशील पाटील, जिल्हा चिटणीस ॲड. आस्वाद पाटिल आणि इतर मान्यवरांचे* मार्गदर्शन होणार आहे.
दिनांक 17 ऑक्टोबर 2021 रोजी होणाऱ्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने खोपोलीत झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत झालेल्या घटनाक्रमा संदर्भातील *शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते किशोर पाटील* यांनी दिलेली माहिती.
खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे
खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...
Comments
Post a Comment