खोपोली --(किशोर साळुंके ) शहर भाजप व भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने सेवा पंधरवड्यानिमित्त रक्तदान शिबिर, ई-श्रम आधार कार्डचे वाटप, सत्कार अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमामध्ये ज्या नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घेतला आहे अशा एकुण 200 लाभार्थींना माजी आमदार तसेच भाजपचे कर्जत विधानसभा अध्यक्ष देवेंद्र साटम यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. तसेच 150 ई-श्रम आधार कार्डचे वाटप करण्यात आले. लोहाणा सभागृहात रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर नगरपालिका रूग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आली.
या वेळी भाजप उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत पुरी, अॅड. राजेंद्र येरूणकर, गटनेते तथा नगरसेवक तुकाराम साबळे, नगरसेविका अपर्णा मोरे, शहर सरचिटणीस हेमंत नांदे, ईश्वर शिंपी, शहर उपाध्यक्ष दिलीप पवार, प्रमोद पिंगळे, चिटणीस गोपाळ बावस्कर, शक्ती केंद्र प्रमुख राहुल जाधव, संजय म्हात्रे जिल्हा कामगार आघाडी उपाध्यक्ष सूर्यकांत देशमुख, युवा मोर्चा अध्यक्ष अजय इंगुळकर, सरचिटणीस विनायक माडपे, उपाध्यक्ष पुनीत तन्ना, पंकज पलांडे, सिद्धेश पाटील, हेमंत भाटिया, अभिनव पाटील, महिला मोर्चा अध्यक्षा शोभा काटे, माजी नगरसेविका अनिता शाह, सरचिटणीस अश्विनी अत्रे, स्नेहल सावंत, स्वाती बिवरे आदी उपस्थित होते.
खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे
खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...
Comments
Post a Comment