Skip to main content

भाजपा परळी तालुका उपाध्यक्षपदी संजय मुंडे यांची निवड ; टोकवाडीत ग्रामस्थाकडून अभुतपुर्व नागरी सत्कार

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांचे विश्वासू संजय मुंडे यांची भारतीय जनता पक्षाच्या परळी तालुका उपाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. यानिवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. दरम्यान टोकवाडी येथे ग्रामस्थ कडूनही निवडीचे स्वागत करत अभुतपुर्व नागरी सत्कार करण्यात आला. भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या सूचनेवरून परळी तालुका भाजपा आणि विविध आघाड्यांची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. भाजपचे तालुकाध्यक्ष सतिश मुंडे यांनी एका पत्राद्वारे टोकवाडी येथील पंकजाताई मुंडे व खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांचे अत्यंत विश्वासू संजय भास्कर मुंडे यांची भाजपाच्या परळी तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून संजय मुंडे यांची ओळख आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्यापासुन अत्यंत विश्वासू कार्यकर्ते आहेत. पंकजाताई मुंडे आणि खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे. अनेक वर्षांपासून भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. त्यांनी भाजपमध्ये विविध पदांवर काम केले आहे. कोरोना काळातही त्यांनी चांगल्या प्रकारे चांगले काम केले आहे. संजय मुंडे यांचा तालुक्यात मोठा जनसंपर्क आहे. त्यांच्या व्यापक जनसंपर्काची दखल घेऊन पंकजाताई मुंडे व खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी भाजपा परळी तालुक्याची धुरा त्यांच्याकडे देत उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. पंकजाताई मुंडे व खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांनी त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत. पंकजाताई आणि खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी भाजपा परळी तालुका उपाध्यक्षपदी निवड करून माझ्यावर खुप मोठा विश्वास टाकला आहे. त्यांचा विश्वास सार्थ करून दाखवणार असुन मुंडे भगीनींच्या नेतृत्वाखाली भाजपाचे काम वाढविणार असल्याचे सांगून त्यांनी टाकलेला विश्वास सार्थ करून दाखवू असे प्रतिपादन नवनिर्वाचित तालुका उपाध्यक्षपदी संजय मुंडे यांनी केले. टोकवाडी येथील भाजपाचे कार्यकर्ते संजय मुंडे यांची भाजपाच्या तालुका उपाध्यक्षपदी निवडीबद्दल ग्रामस्थांच्या वतीने जल्लोषात स्वागत करत शाल श्रीफळ, फेटाबांधून तसेच पुष्पहार घालून जंगी नागरी अभूतपूर्व स्वागत करण्यात आले. संजय मुंडे यांच्या निवडीने कार्यकर्त्यात आनंद संचारला आहे व मुंडे भगिनींनी केलेली निवडी योग्य असून झालेल्या निवडीत गोरगरीब कार्यकर्त्यांची पाठराखण करणारे शिलेदार निवडल्याने मनस्वी आनंद झाला असल्याचे अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे अमर रहे पंकजाताई साहेब मुंडे खासदार प्रितमताई मुंडे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणाने कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला या आनंदोत्सव प्रसंगी टोकवाडी व परिसरातील नागरिक उपस्थित होते. ग्रामस्थांनी केलेला सत्कार आणि उस्फुर्तपणे स्वागताने मी भारावून गेलो असल्याचे नवनिर्वाचित तालुका उपाध्यक्ष संजय मुंडे यांनी सांगितले आहे.

Comments

Popular posts from this blog

खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे

खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...

महिला रिक्षा चालक प्रतिक्षा प्रतिक्षा वाघमारे यांनी सूरु केलेल्या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक ..

खोपोली ( किशोर साळुंके ) खोपोली शहरातीत पहिल्या महिला रिक्षा चालक प्रतिक्षा वाघमारे आपल्या कुटुंबीयांना रिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक बळ देत आहेत.आपले कुटुंब सांभाळत असताना मात्र रिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून सामाजिक कार्यातही सक्रिय असतात.प्रतिक्षा वाघमारे यांनी रिक्षा व्यवसाय सुरु केल्याने त्यांची प्रेरणा घेत आज शहरात अनेक महिलांनीही रिक्षा व्यवसाय सुरु करुन स्वाभिमानाने आत्मनिर्भर होताना दिसून येत आहेत .जादा पैसे देणारे भाडे नाकारुन जेष्ठ नागरिकांसाठी व कुठे अपघात घडला असेल अथवा रात्री अपरात्री महिलांच्या प्रसुतीसाठी बोलावणे आलेच तर त्यांना प्रथम प्राधान्य देत वरिल अडचणीत असणार्यांना तात्काळ सेवा देण्यासाठी प्रतिक्षा वाघमारे नेहेमी तत्पर असतात.सद्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरु असुन या विद्यार्थ्यांना वेळेवर परिक्षा केंद्रा पर्यंत पोहोचण्यासाठी कोणतीही अडचण होवू नये यासाठी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सामाजिक बांधिलकी जपत एका अनोख्या सामाजिक उपक्रम सुरु करुन या विद्यार्थ्यांसाठी आपल्या रिक्षाच्या माध्यमातून मोफत सेवा स...

आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनीचा वर्धापन दिन लोहोप प्रा आ केंद्रात उत्साहात साजरा,केंद्रीय आरोग्य मंत्रीनि साधला ऑनलाइन संवाद

किशोर साळुंके :- आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी या उपक्रमाच्या चौत्या वर्धापणदिना निमित्ताने केंद्रीय आरोग्य मंत्री यांनी ऑनलाइन संवाद साधण्यासाठी रायगड जिल्ह्यातील नव्यानेच सुरू झालेल्या खालापूर तालुक्यातील लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्रातीळ आरोग्य अधिकारी डॉ सीमा पाईकराव यांची निवड करण्यात आली असून लोहोप येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून या उपक्रमाचे उदघाटन करण्याचा मान लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळाला असून या उपक्रमाचे उदघाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुधाकर मोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडवैया यांनी आरोग्य कर्मचारी आणि रुग्णांशी संवाद साधून विविध प्रकारे मार्गदर्शन केले. भारत सरकार कडून चार वर्षांपूर्वी 14 एप्रिल 2018 रोजी आरोग्य विभागाकडून आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी हा उपक्रम सुरू करण्यात आला होता या उपक्रमाला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे या निमित्ताने या उपक्रमाचा आज चौथा वर्धापनदिन आहे.त्यामुळे प्रत्येक जिल...