खोपोली (किशोर साळुंके )
देशभरातील दुर्दैवी घटनांचे पडसाद खोपोलीत न उमटल्याने पोलीस प्रशासनाने मानले सर्वांचे आभार
खोपोली : देशभरात विविध ठिकाणी त्रिपुरा मधील विवादास्पद घटनेच्या पार्श्वभूमीवर उमटलेल्या पडसादाची कोणतीच लक्षणे खोपोली शहरामध्ये दृष्टीपथास आलेली नसल्याचे संपूर्ण श्रेय हे खोपोलीतील सुज्ञ जनतेलाच जाते, त्यामुळे पोलिस प्रशासनाच्यावतीने मी सर्व खोपोलीकरांचे कौतुक करतो, अशा शब्दात शांतता कमिटीच्या बोलावलेल्या तातडीच्या बैठकीत खोपोलीचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी प्रतिपादन केले.
विवादित घटनाक्रमाचा विपर्यास्त सोशियल मीडियाच्या माध्यमातून झाल्याने सामाजिक सलोखा बिघडला आणि परिणामांती दंगली सारख्या घटना घडल्या त्याबाबतीत खोपोलीकरानी अत्यंत सोशिक भूमिका घेतलेली आहेच मात्र भविष्यात कोणत्याही घटनेची पार्श्वभूमी समजून घ्यावी आणि कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये अशी सूचना वजा आवाहन पोलीसनिरीक्षक पवार यांनी या बैठकीमध्ये केले.
खोपोलीच्या नगराध्यक्षा सुमन औसरमल यांनीही शांतता कमिटीला संबोधित करून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची खात्री देताना त्यासाठी यापुढे आपण सर्वजण सतर्क राहणार आहोत अशी हमी देत पोलीस प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करण्याची भूमिका विषद केली.
खोपोलीतील राजकीय, सामाजिक क्षेत्रातले नेते आणि कार्यकर्ते, व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी, विविध संघटनांचे कार्यकर्ते आणि पत्रकार यावेळी उपस्थित होते.
खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे
खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...
Comments
Post a Comment