खोपोली : (आदर्श बेंबडे) : खालापूर तालुक्यातील लोहप गावानजीक असणाऱ्या आदित्य बिर्ला हायटेक कार्बन कंपनीतून निघणाऱ्या काळ्या केमिकल युक्त पावडर मुळे स्थानिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असून निसर्गाचीही हाणी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
खालापूर तालुका तसा औद्योगीकरणात अग्रेसर आहे. साधारण पाचशेच्या आसपास येथे छोटे मोठे कारखाने आहेत. अशाच कारखान्यांपैकी एक असणारा लोहप गावा लागतचा मौजे तळवली येथिल आदित्य बिर्ला हायटेक कार्बन कं.यात केमिकल युक्त काम चालते. यामुळे या कारखाण्यातून काळ्या रंगाची केमिकल युक्त पावडर मोठ्या प्रमाणात बाहेर फेकली जाते. या पावडर ला 'चारकोळ 'म्हणुन संबोधले जाते. ही पावडर हवेतून आसपासच्या गावांमध्ये पसारते. यामुळे येथिल नागरिकांना श्वसनाचे व चर्मरोगाचे विविध आजार जडत चालले आहेत. दमा, खोकला, टीबी यासारख्या भीषण आजरांची वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच निसर्गाची हानीही होत आहे. जमिनीत त्या पावडर मुळे केमिकल पसरत आहे. झाडा, झुडूपांवर त्याचा असर होत आहे. मूकजनावर पाला पाचोळा खाताना ही पावडर त्यांच्या पोटात जाऊन भीषण आजार होण्याची शक्यता आहे.
याबाबत स्थानिक ग्रामस्थ मंडळ लोहप खालापूर यांच्या वतीने या कंपनीतून निघणारी ती पावडर त्वरित बंद व्हावी व कंपनीवर कडक शासन करावे यासाठी अतुल शेलार यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ रायगड, जिल्हाधिकारी रायगड, जिल्हा अधीक्षक रायगड, खालापूर तहसीलदार, रसायनी पोलीस ठाणे, आमदार उरण यांस लेखी तक्रार अर्ज दिले आहेत.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर होणाऱ्या अपघातात मदत करणारे पळस्पे आणि बोरघाट पोलिस विभागाचे अधिकारी व कर्मचारी, रस्त्यांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, टोल प्लाझा मधले आय. आर. बी. चे कर्मचारी व महामार्गावर दुरुस्ती काम करणाऱ्या कामगाराना रेसिलियेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून गोल्डन अवर मध्ये उपचार आणि बचाव कार्य संबंधीचे धडे भूपेंद्र मिश्रा यांनी दिले. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या संसाधनातून, तंत्रशुद्धरित्या, तत्काळ आणि सहजपणे प्रथम उपचार कसे करता येतात, याबद्दल प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. अपघातात चुकीच्या पद्धतीने जखमींना हाताळल्याने गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात हे वेगवेगळ्या पद्धतीने शिबिरार्थींना समजावून देत तसे प्रकार टाळण्याकरिता योग्य उपाय सुचविले. रेसिलियेंट फाऊंडेशने आयोजित केलेल्या शिबीराचे संदर्भात अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या गुरुनाथ साठेलकर यांनी प्रास्ताविक केले तर पोलिस वाहतूक विभागाकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी यांनी आभार व्यक्त केले. रेसिलियेंट फाऊंडेशन, महाराष्ट्र पोलीस, वाहतूक पोलिस यंत्रणा आणि प्र...
Comments
Post a Comment