खोपोली :किशोर साळुंके
रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, संचलित "खेलो इंडिया" या केंद्र सरकारच्या योजने अंतर्गत "जिल्हा कुस्ती केंद्राचे" उद्घाटन रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्या हस्ते स्वर्गीय भाऊ कुंभार कुस्ती संकुल, खोपोली येथे संपन्न झाले.
महाराष्ट्र राज्यात मंजूर झालेल्या अवघ्या तीन कुस्ती केंद्रात खोपोलीच्या स्वर्गीय भाऊ कुंभार कुस्ती संकुलात कुस्ती केंद्र मंजूर करून कुस्तीगिरांचे भवितव्य घडविण्याचा संकल्प या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने केला गेला. स्वर्गीय भाऊ कुंभार यांचे स्मरण करून जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी त्यांच्याच नावे निर्माण झालेल्या संकुलात कुस्ती केंद्राचे उद्घाटन करण्याचा अपूर्व योग आल्याबद्दल आपण भाग्यवान असल्याचे सांगून या योजने अंतर्गत जास्तीत जास्त निधी या ठिकाणी आणण्याचा आपला प्रयत्न असणार असल्याचे सांगितले.
राज्य क्रीडा प्रशिक्षक संदीप वांजळे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की, खोपोली शहरातील कुस्तीगीरांची संख्या पाहता, याच ठिकाणी कुस्ती केंद्र असावे असा आग्रह होता त्या नुसार प्रशासकीय पूर्तता करून हे केंद्र मंजूर झाल्याने येथून देशपातळीवर चांगले कुस्तीपटू निर्माण करण्याचा प्रयत्न होईल.
खालापूर तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष सुनील पाटील यांनी या कुस्ती केंद्राच्या माध्यमातून खोपोली शहराचे नाव या क्षेत्रात अधोरेखित होईल असा विश्वास व्यक्त केला. खोपोलीच्या उपनगराध्यक्षा विनिता कांबळे यांनी या कुस्ती केंद्रासाठी नगरपालिकेकडून शक्य तितकी मदत करण्याचा मनोदय व्यक्त केला. नगराध्यक्षा सुमन ताई औसरमल यांनी खेलो इंडिया योजने अंतर्गत मंजूर झालेले कुस्ती केंद्र म्हणजे खोपोलीचा सन्मान असल्याचे सांगत या केंद्रात प्रशिक्षण घेणाऱ्या अधिकाधिक खेळाडूंना प्राधान्य मिळेल याकडे आपलाही कटाक्ष असेल असे सांगत, सर्वांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खालापूर तालुका कुस्तीगीर संघाचे सचिव जगदीश महाराजचे आणि आभार प्रदर्शन कुस्ती प्रशिक्षक राजू कुंभार यांनी केले.
या कार्यक्रमासाठी खोपोलीचे माजी उपनगराध्यक्ष राजू गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते विजय पाटील, शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त मारुती आडकर, सुभाष घासे, क्रीडा प्रशिक्षक डॉ जयवंत माने, राजाबापू सगळगीळे, पद्माकर गायकवाड, हेमंत खाडे इत्यादी मान्यवर व्यासपीठावर होते. या सोहळ्यात बाल आणि युवा कुस्तीगीर आणि त्याचप्रमाणे त्यांच्या पालकांनी उपस्थिती दर्शवली होती.
खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे
खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...
Comments
Post a Comment