परळी : मंगेश वाघमारे
सुधागड तालुक्यातील हातोंड ग्रामपंचायत हद्दीतील कसईशेत ठाकुरवाडी येथे रायगड भुषण ह. भ. प. रामदास महाराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्री हनुमंत राय यांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. त्यानिमित्ताने दिनांक २५ डिसेंबर ते २६ डिसेंबर या कालावधीत प्राणप्रतिष्ठा महायज्ञ सोहळा आयोजित करण्यात आला होता. शनिवार दिनांक २५ /१२ / २०२१ रोजी वास्तु पुजा, नवग्रह पूजन, होम हवन विधी, हरिपाठ, जलावास, धान्यवास असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तसेच सायंकाळी ४ वाजता दिंडी सोहळा तर रात्री ९ नंतर जागर भजन करण्यात आले. रविवार दिनांक २६ / १२ / २०२१ रोजी मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा, कळशारोहन, सत्यनारायणाची महापूजा, सामुदायिक हरिपाठ आणि रात्री ९ वाजता गुरुवर्य ह.भ.प. श्री. रामदास महाराज पाटील यांचे सुश्राव्य असे कीर्तन पार पडले. या कार्यक्रमाला महाप्रसाद हातोंड ग्रामपंचायतीच्या सरपंच आशाताई रमेश पाठारे व संदेश सखाराम तवले यांच्या वतीने देण्यात आला. दिनांक २६ /१२ / २०२१ रोजी सायंकाळी ७ वाजता दीपोत्सव कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात बोलताना दत्तात्रेय सकपाळ यांनी कसईशेत ग्रामस्थांचे कौतुक केले. ते म्हणाले की, कसईशेत ग्रामस्थ हे मनमिळाऊ व संकटात धावून जाणारे आहेत. त्यांनी अतिशय परिश्रमाने हनुमानाचे मंदिर उभारले असून समाजापुढे एक चांगला आदर्श घालून दिला आहे. सम्यक क्रांती विचार मंचचे अध्यक्ष तथा पत्रकार मंगेश वाघमारे यांनीही आपले विचार मांडले. ते म्हणाले की, ठाकूर समाज हा प्रामाणिक, कष्टाळू आणि संघटनेने जगणारा समाज आहे. कितीही राजकारण झाले, वाद झाला तरी देखील ठाकुर समाज हा एकत्र बसूनच निर्णय घेतो. गावकीच्या निर्णयाच्या विरोधात कुणीही जात नसल्यामुळे ठाकूर समाजाची प्रगती दिवसेंदिवस होत आहे. ठाकूर समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला असून व्यसनापासूनही हा समाज दूर जाताना दिसत आहे. रायगड भूषण रामदास महाराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वारकरी संप्रदायाची वाढ होत असून आदिवासी समाज देखील वारकरी संप्रदायाच्या मार्गाने चालताना दिसत आहे. ह. भ. प. रामदास महाराज पाटील यांनी हनुमान मंदिराच्या मंदिरासाठी मोफत जागा उपलब्ध करून देणाऱ्या हिरू बामा शिद यांचा सत्कार करून आजच्या युगात फूटभर जागेसाठी भांडणाऱ्या लोकांमध्ये हिरु बामा शिद यांनी फार मोठे दान देऊन समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. अशी त्यागी माणसे फार कमी प्रमाणात आढळतात. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना हातोंड ग्रामपंचायतीच्या सरपंच आशाताई पाठारे यांनी सांगितले की, कसईशेत ग्रामस्थांनी एकोपा दाखून हनुमानाचे मंदिर उभारले आहे. त्यांच्या या कार्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.
कार्यक्रमाला पीएसआय राम पवार, मारुती पांगारे, उपसरपंच पंकज पाठारे, परळी ग्रामपंचायतीचे सदस्य महेश ठाकूर, रमेश विष्णू पाठारे, दत्तात्रय सपकाळ, माजी सरपंच शंकर कडू, माजी उपसरपंच अनंत भोसले, जगन्नाथ पाठारे, माजी उपसरपंच ज्ञानेश्वर घोंगे, विठ्ठल सिंदकर, माजी सरपंच झिमा कोकरे, शाहीर दामोदर शिद, धावू हिरवा, काशिनाथ पाठारे, रमेश घोंगे, संदेश तवले यांच्यासह पंचक्रोशीतील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किसन हिरु वाघमारे, रमेश कानू वाघमारे, दिनकर सोमा शिद, मारुती हाशा निरगुडा, ताई किसन वाघमारे, इंदु गोमा ठोंबरे व कसईशेत ग्रामस्थ यांनी विशेष परिश्रम घेतले.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर होणाऱ्या अपघातात मदत करणारे पळस्पे आणि बोरघाट पोलिस विभागाचे अधिकारी व कर्मचारी, रस्त्यांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, टोल प्लाझा मधले आय. आर. बी. चे कर्मचारी व महामार्गावर दुरुस्ती काम करणाऱ्या कामगाराना रेसिलियेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून गोल्डन अवर मध्ये उपचार आणि बचाव कार्य संबंधीचे धडे भूपेंद्र मिश्रा यांनी दिले. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या संसाधनातून, तंत्रशुद्धरित्या, तत्काळ आणि सहजपणे प्रथम उपचार कसे करता येतात, याबद्दल प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. अपघातात चुकीच्या पद्धतीने जखमींना हाताळल्याने गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात हे वेगवेगळ्या पद्धतीने शिबिरार्थींना समजावून देत तसे प्रकार टाळण्याकरिता योग्य उपाय सुचविले. रेसिलियेंट फाऊंडेशने आयोजित केलेल्या शिबीराचे संदर्भात अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या गुरुनाथ साठेलकर यांनी प्रास्ताविक केले तर पोलिस वाहतूक विभागाकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी यांनी आभार व्यक्त केले. रेसिलियेंट फाऊंडेशन, महाराष्ट्र पोलीस, वाहतूक पोलिस यंत्रणा आणि प्र...
Comments
Post a Comment