खोपोली - ( किशोर साळुंके ) - खालापूर तालुक्यातील देवन्हावे गृप ग्रामपंचायतीवर समर्थ आघाडीचे बहुमत असल्यामुळे पुढील एक वर्षांंच्या कालावधीसाठी गावाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करणारे, कार्यसम्राट समजले जाणारे संदेश चौधरी यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. संदेश चौधरी यांची उपसरपंचपदी निवड झाल्याने समर्थ विकास अघाडीच्या गटात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत असून नवनिर्वाचीत उपसरपंच चौधरी यांच्यावर सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.मी गेले अनेक वर्ष गावाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे केलेल्या कामचे फळ आज मला मिळाले आहे.या पदासाठी माझी निवड सूरवातीलाच व्हावी अशी माझ्या सर्व पक्षातील अनेकांची इच्या होती परंतू राष्ट्रवादी काँ.पक्षाचे सर्वासर्वे आदरणीय नेते शरदचंद्र पवार यांच्या आदेशानूसार प्रथम प्राधान्य महिलांना देण्याच्या आदेशाचे पालन करत मी वरिल पद हे शेवटच्या वर्षी घेतले तसेच आमचे व सर्वांचे लाडके सरपंच अंकित साखरे हे आमचे सर्वच बाबतीत स्ट्राँग असल्यामुळे गावातील विकासकामे मार्गी लावण्यात अडचणी येणार नाहीत .तसेच गावातील विकासकामे करत असताना सत्ताधारी व विरोधक एकत्र येवून कामे करत असतो व गावातील नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाला प्रथम प्राधान्य देणार आसल्याची प्रतिक्रिया यावेळी नवनिर्वाचीत उपसरपंच संदेश चौधरी यांनी पत्रकारांसमोर दिली.
खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे
खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...
Comments
Post a Comment