Skip to main content

खालापूर तालुक्यात सहज निसर्ग शाळेचा शुभारंभ. वीटभट्टी कामगारांच्या मुलांसाठी सहजसेवा फाउंडेशनचे साक्षरता वर्गाचे धडे...

प्रतिनिधी-- (किशोर साळुंके ) खालापूर तालुक्यात विविध वीटभट्टी व कंपन्या आहेत.यातील बऱ्याचशा कामगारांची व मजुरांची मुले कायम अशिक्षित राहतात. पर्यायाने ही मुले कायम निरक्षर राहतात. समाजातील हा उपेक्षित घटक साक्षर व्हावा या सामाजिक भावनेतून सहजसेवा फाउंडेशनने महड फाटा येथील वीटभट्टी येथे रविवार दिनांक 19 डिसेंबर पासून झाडाच्या सावलीखालील शाळेचा शुभारंभ केला आहे.दर रविवारी भरणाऱ्या या निसर्ग शाळेमध्ये विद्यार्थ्यांना साक्षर बनविण्याचे धडे दिले जातील. याच सोबत विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी उत्पन्न व्हावी यासाठी विविध उपक्रम सुद्धा राबविले जातील शिवाय प्रत्येक विद्यार्थ्यांना ओळखपत्र पुरविण्यात आले.
मुलांना साक्षर बनवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न असण्याबरोबरच या विद्यार्थ्यांच्या आईवडिलांना मुलांना शालेय शिक्षण घेण्यासाठी प्रबोधन केले जाईल तसेच वीटभट्टी काम करणाऱ्या महिलांसाठी आरोग्य व स्वच्छतेचे धडे देण्यात येतील. या उपक्रमाचा शुभारंभ राजेंद्र फक्के, राजेश पाटील,मोहन केदार,नितीन मोरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी ध्यास प्रतिष्ठान,पुणेचे अध्यक्ष सोमनाथ पाटील,चैताली ढमाले,राहुल डेरेकर,अमोल चव्हाण तसेच अझीम कर्जिकर,आसिफ जळगावकर,आतिक मांडलेकर, आश्रफ जळगावकर,मौजम मांडलेकर उपस्थित होते. देशाचे भवितव्य असणारे हात शिकवून साक्षर करूया व उपेक्षित घटकांना या होणाऱ्या सामाजिक मदत कार्यात टाटा स्टील,निलम पाटील,संतोष गायकर,आनंद शाळा खोपोली,शिशु मंदिर खोपोली,प्रदीप खंडेलवाल,ज्योती भुजबळ,खोपोली परळी जांभुळ पाडा लोहाना महाजन समाज,रोहित टिम्बर,राकेश ओसवाल,ठाकरे मेडिकल्स खोपोली यांचे विशेष सहकार्य लाभले.या मुलांना साक्षर करण्यासाठी नकुल देशमुख,इशिका शेलार व कांचन सावंत यांनी शिक्षकरूपात जबाबदारी स्वीकारली आहे. या उपक्रमात स्व.अनंता काशिनाथ मोरे यांच्या स्मरणार्थ नगरसेवक नितीन मोरे यांनी ओम्नी गाडी भेट दिली. सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहज सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. शेखर जांभळे,उपाध्यक्षा माधुरी गुजराथी,उपाध्यक्षा इशिका शेलार, सचिव वर्षा मोरे,कार्यवाह बी. निरंजन, आफताब सय्यद,बंटी कांबळे,अखिलेश पाटील,जयश्री भागेकर यांनी अथक परिश्रम घेतले. महड येथील शुभारंभ झालेल्या या उपक्रमातुन मुले साक्षर होण्याने समाजासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल, तसेच लवकरच तालुक्यातील विविध ठिकाणी सहजसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजन करण्यात येईल,आपल्या विभागात अश्या प्रकारच्या गरजू घटकांसाठी निसर्ग शाळा सुरू करण्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन खालापूर तालुका वीट भट्टी संघटनेचे अध्यक्ष अझीम कर्जिकर यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे

खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...

रेसिलियेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून एक्स्प्रेस वेवर प्रथमोपचार प्रशिक्षण शिबिराचे आयोजन.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर होणाऱ्या अपघातात मदत करणारे पळस्पे आणि बोरघाट पोलिस विभागाचे अधिकारी व कर्मचारी, रस्त्यांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, टोल प्लाझा मधले आय. आर. बी. चे कर्मचारी व महामार्गावर दुरुस्ती काम करणाऱ्या कामगाराना रेसिलियेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून गोल्डन अवर मध्ये उपचार आणि बचाव कार्य संबंधीचे धडे भूपेंद्र मिश्रा यांनी दिले. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या संसाधनातून, तंत्रशुद्धरित्या, तत्काळ आणि सहजपणे प्रथम उपचार कसे करता येतात, याबद्दल प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. अपघातात चुकीच्या पद्धतीने जखमींना हाताळल्याने गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात हे वेगवेगळ्या पद्धतीने शिबिरार्थींना समजावून देत तसे प्रकार टाळण्याकरिता योग्य उपाय सुचविले. रेसिलियेंट फाऊंडेशने आयोजित केलेल्या शिबीराचे संदर्भात अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या गुरुनाथ साठेलकर यांनी प्रास्ताविक केले तर पोलिस वाहतूक विभागाकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी यांनी आभार व्यक्त केले. रेसिलियेंट फाऊंडेशन, महाराष्ट्र पोलीस, वाहतूक पोलिस यंत्रणा आणि प्र...

आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनीचा वर्धापन दिन लोहोप प्रा आ केंद्रात उत्साहात साजरा,केंद्रीय आरोग्य मंत्रीनि साधला ऑनलाइन संवाद

किशोर साळुंके :- आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी या उपक्रमाच्या चौत्या वर्धापणदिना निमित्ताने केंद्रीय आरोग्य मंत्री यांनी ऑनलाइन संवाद साधण्यासाठी रायगड जिल्ह्यातील नव्यानेच सुरू झालेल्या खालापूर तालुक्यातील लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्रातीळ आरोग्य अधिकारी डॉ सीमा पाईकराव यांची निवड करण्यात आली असून लोहोप येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून या उपक्रमाचे उदघाटन करण्याचा मान लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळाला असून या उपक्रमाचे उदघाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुधाकर मोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडवैया यांनी आरोग्य कर्मचारी आणि रुग्णांशी संवाद साधून विविध प्रकारे मार्गदर्शन केले. भारत सरकार कडून चार वर्षांपूर्वी 14 एप्रिल 2018 रोजी आरोग्य विभागाकडून आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी हा उपक्रम सुरू करण्यात आला होता या उपक्रमाला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे या निमित्ताने या उपक्रमाचा आज चौथा वर्धापनदिन आहे.त्यामुळे प्रत्येक जिल...