खोपोली (प्रतिनिधी )- खोपोली शिळफाटा येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४वर स्पीड ब्रेकर बसविण्याची महत्वाची मागणी खोपोली नगर पालिकेच्या नगरसेविका वनिता काळे, नगरसेवक सुनिल पाटिल व उद्योजक हरीश काळे यांनी करताच सदर महामार्गचे प्रकल्प अधिकारी यांनी त्वरित ग्रीन पार्क व सेलिब्रेशन हॉटेल समोर स्पीड ब्रेकर ची निर्मिती केली.
शिळफाटा खोपोली येथे शाळा असल्याने विद्यार्थी व पालक यांची मोठी वरदळ असते. तसेच व्यापारी, दुकाने येथे ग्राहकांची रेलचेल असते. त्यात महामार्ग अरुंद आहे. वाहने भरधाव पळत असतात. अपघात घडण्याची शक्यता असल्याचे लक्षात येताच नगरसेविका वनिता काळे, नगरसेवक सुनील पाटील, उद्योजक हरीश काळे यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांकडे स्पीड ब्रेकर निर्माण करण्याची मागणी करताच त्यांनी त्वरित ती मागणी मान्य करत त्वरित ब्रेकर निर्माण केले.
स्थानिक नागरिकांनी लोकसेवकांचे आभार मानले.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर होणाऱ्या अपघातात मदत करणारे पळस्पे आणि बोरघाट पोलिस विभागाचे अधिकारी व कर्मचारी, रस्त्यांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, टोल प्लाझा मधले आय. आर. बी. चे कर्मचारी व महामार्गावर दुरुस्ती काम करणाऱ्या कामगाराना रेसिलियेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून गोल्डन अवर मध्ये उपचार आणि बचाव कार्य संबंधीचे धडे भूपेंद्र मिश्रा यांनी दिले. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या संसाधनातून, तंत्रशुद्धरित्या, तत्काळ आणि सहजपणे प्रथम उपचार कसे करता येतात, याबद्दल प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. अपघातात चुकीच्या पद्धतीने जखमींना हाताळल्याने गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात हे वेगवेगळ्या पद्धतीने शिबिरार्थींना समजावून देत तसे प्रकार टाळण्याकरिता योग्य उपाय सुचविले. रेसिलियेंट फाऊंडेशने आयोजित केलेल्या शिबीराचे संदर्भात अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या गुरुनाथ साठेलकर यांनी प्रास्ताविक केले तर पोलिस वाहतूक विभागाकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी यांनी आभार व्यक्त केले. रेसिलियेंट फाऊंडेशन, महाराष्ट्र पोलीस, वाहतूक पोलिस यंत्रणा आणि प्र...
Comments
Post a Comment