खोपोली -(रोहिदास वाणी )-खालापूर तालुक्यातील ३५०एकर जमीन शेतकऱ्यांकडून एका खाजकी कंपनीने विकत घेऊन लोकप्रतिनिधिच्या नातेवाईकांना विकत असल्याचा प्रकार समोर आल्याने व शेतकऱ्यांना अजुन पुर्ण रक्कम मिळत नसल्याने त्यांना न्याय मिळावा या उद्देश्याने माजी आमदार सुरेश लाड यांनी आज खालापूर तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करणार होते. पण तांत्रिक बाबी मुळे त्यांचे आंदोलन स्थगित करून पुढे ढकलण्यात आले.
खालापूर तालुक्यातील नंदनपाडा, गोहे, गोठीवली या ठिकाणी औद्योगिक कारणा करिता न्यूमिलेनियम कंपनीने शेतकऱ्यांकडून साधारण ३५० एकर जमीन विकत घेतली. ती जमीन आता सदर कंपनी काही लोकप्रतिनिधी यांच्या नातेवाईकांना विकण्याचा आरोप होत आहे.तसेच या शेतकऱ्यांना जमिनीचा पुर्ण मोबदला मिळाला नसल्याचे समोर आले. यानंतर मा. आमदार सुरेश लाड यांनी खालापूर तहसीलदार यांना पत्र देऊन कारवाई करण्याची मागणी केली. कारवाई करण्याचे आश्वासन दिले पण कारवाई न झाल्याने आज २३/१२/२१रोजी लाड यांनी खालापूर तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा देऊन आत्मदहन करण्यास आले होते.
परंतु प्रशासनाच्या विनंतीवरून व तांत्रिक अडचणीमुळे सदर आंदोलन थांबाविले असून न्याय न मिळाल्यास सदर आंदोलन पुन्हा करण्यात येईल असा इशारा सुरेश लाड यांनी दिला आहे.
सदर आंदोलनात हनुमंत पिंगळे,अंकित साखरे, सुवर्णा संतोष मोरे,शरद लाड, विजय पाटिल, शेखर पिंगळे तसेच तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर होणाऱ्या अपघातात मदत करणारे पळस्पे आणि बोरघाट पोलिस विभागाचे अधिकारी व कर्मचारी, रस्त्यांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, टोल प्लाझा मधले आय. आर. बी. चे कर्मचारी व महामार्गावर दुरुस्ती काम करणाऱ्या कामगाराना रेसिलियेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून गोल्डन अवर मध्ये उपचार आणि बचाव कार्य संबंधीचे धडे भूपेंद्र मिश्रा यांनी दिले. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या संसाधनातून, तंत्रशुद्धरित्या, तत्काळ आणि सहजपणे प्रथम उपचार कसे करता येतात, याबद्दल प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. अपघातात चुकीच्या पद्धतीने जखमींना हाताळल्याने गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात हे वेगवेगळ्या पद्धतीने शिबिरार्थींना समजावून देत तसे प्रकार टाळण्याकरिता योग्य उपाय सुचविले. रेसिलियेंट फाऊंडेशने आयोजित केलेल्या शिबीराचे संदर्भात अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या गुरुनाथ साठेलकर यांनी प्रास्ताविक केले तर पोलिस वाहतूक विभागाकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी यांनी आभार व्यक्त केले. रेसिलियेंट फाऊंडेशन, महाराष्ट्र पोलीस, वाहतूक पोलिस यंत्रणा आणि प्र...
Comments
Post a Comment