खोपोली - प्रतिनिधी-- (किशोर साळुंके ) : खोपोली शहरात गेले काही महिन्यांपासून विविध विकास कामांचे भूमिपूजन सूरु आहेत.ही भूमी पुजने होत असताना प्रभागा क्रमांक तिनचे धडाडीचे व प्रभागाचा विकासाठी आहोरात्र झटणारे कार्यसम्राट म्हणून ज्यांनी आपली सर्वसामान्यांमध्ये छाप उमटविणारे किशोर पानसरे यांनी आपल्या प्रभागातील भूमिपूजनाचे वेगळ्याच पद्धतीने , हटके भूमिजनाला सूरवात केल्याचे दिसून आले आहे. त्यांनी या प्रभागातील नव्याने विवाह झालेल्या नवं दांपत्य यांच्या हस्ते भूमिपूजन केले.
नगरसेवक किशोर पानसरे यांनी आपल्या मनोगतात विचार मांडताना सांगितले कि,ज्यांच्या प्रामाणिक काम केलेल्य व माझ्यावर विश्वास दाखवून आज या नगरसेवक या पदावर विराजमान करणारे जेष्ठ नागरीक , मित्रपरिवार , वार्डातील व शहरातील सामाजिक कार्यकर्ते यांच्या हस्ते भूमिपूजन करण्याचा मान देत भूमिपूजन करुन घेत आहोत.
शहरातील प्रकाशनगर येथील सामाजिक कार्यकर्ते अमित चव्हाण व सोनू चव्हाण यांच्या घराच्या पाठीमागून सांड पाण्याचा निचरा होत नसल्याने या ठीकाणी सांडपाण्यामुळे दुर्गंधी पसरत असल्याचे नगरसेवक पानसरे यांच्या लक्षात येताच दुर्गंधीयुक्त पाण्याच्या निचरा करण्यासाठी पानसरेंच्या प्रयत्नातून आज दि.२८ डिसेंबर रोजी दोन दिवसांपूर्वीच विवाह संपन्न झालेल्या नव वधू वर पूजा व रवी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्याचा एक वेगळाच ..हटके भूमिपूजन सोहळा करण्यात आल्यामुळे या विभागातील नागरिकांनी पानसरे यांचे भरभरुन कौतुक केले.
खोपोली शहरातील आकाश सताने, अमित पवार, दिनेश मोरे, मुंडे तसेच गावातील नागरिक व मित्रपरिवार उपस्थित होते.
खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे
खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...
Comments
Post a Comment