Skip to main content

मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून खालापूर प्रेस क्लब च्या पुढाकारातून स्पंदन हॉस्पिटलमध्ये पत्रकारांची आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

खोपोली - प्रतिनिधी-- देशातील मराठी पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या मराठी पत्रकार परिषदेचा आज 83 वा वर्धापन दिन राज्यात पत्रकार आरोग्य तपासणी दिन म्हणून साजरा होत आहे.. त्याचे औचित्य साधून खालापूर प्रेस क्लब ने खोपोली येथील स्पंदन हॉस्पिटलचे डॉ प्रसाद पाटील यांच्या सहकार्याने पत्रकारांची आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले या शिबिरासाठी खोपोली खालापुर तालुक्यातील जवळपास 35 हुन अधिक पत्रकारांनी सहभाग घेऊन तपासण्या करून घेतल्या त्यामुळे बऱ्याच कालावधी नंतर सर्वच पत्रकार एकत्र आल्याची भावना पत्रकारांनी व्यक्त केली मराठी पत्राकर परिषदेची स्थापना दिन हा महाराष्ट्रात 3 डिसेंबर रोजी साजरा होत असल्याने मुख्य विस्वस्त रायगड प्रेस क्लबचे संस्थापक एस एम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात पत्रकार बधुंची आरोग्य तपासणी होत आहे त्यामुळे खालापूर प्रेस क्लब ने ही पुढाकार घेत खोपोली खालापुरातील पत्राकर बंधूंची आरोग्य तपासणी शिबीर खोपोली मधील स्पंदन हॉस्पिटलमध्ये घेण्यात आले यावेळी जेष्ट पत्रकार भाई ओव्हाळ,गोकुलंदास येशिकर, प्रशांत गोपाळे ,बाबू पोटे,अमोल पाटील,जयवंत माडपे ,अरुण नलावडे, प्रवीण जाधव अनिल वाघमारे, अंकुश मोरे, दिलीप पवार,महेबूब जमादार , एस टी पाटील,संदीप ओव्हाळ,दिनेश पाटील, रवी मोरे,समाधान दिसले ,हनुमान मोरे,संतोषी म्हात्रे ,सारिका सावंत, अर्जुन कदम,आकाश जाधव,तय्याब खान ,नवज्योत पिंगले ,संतोष गोतारने, किशोर साळुंखे, योगेश वाघमारे, शेखर परब ,प्रसाद अटक यांच्यासह आदी पत्रकार उपथीत होते यावेळी पत्रकारांची वजन उंची ब्लड प्रेशर,रक्ताच्या सर्व तपासान्या ई सी जी सह पूर्ण शरीर तपासणी मशिनव्दारे करण्यात आली यावेळी डॉ प्रसाद पाटील व त्याच्या सहकारी श्रद्धा जंगम,पूजा वाघमारे,सुगंधा चिवटे ,शोभा सणस, जिनिफर भोपतराव आदी कर्मचारी वर्गाने विशेष मेहनत घेऊन तपासण्या केल्या त्यामुळे खालापूर प्रेस क्लब चे अध्यक्ष प्रशांत गोपाळे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले

Comments

Popular posts from this blog

खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे

खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...

महिला रिक्षा चालक प्रतिक्षा प्रतिक्षा वाघमारे यांनी सूरु केलेल्या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक ..

खोपोली ( किशोर साळुंके ) खोपोली शहरातीत पहिल्या महिला रिक्षा चालक प्रतिक्षा वाघमारे आपल्या कुटुंबीयांना रिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक बळ देत आहेत.आपले कुटुंब सांभाळत असताना मात्र रिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून सामाजिक कार्यातही सक्रिय असतात.प्रतिक्षा वाघमारे यांनी रिक्षा व्यवसाय सुरु केल्याने त्यांची प्रेरणा घेत आज शहरात अनेक महिलांनीही रिक्षा व्यवसाय सुरु करुन स्वाभिमानाने आत्मनिर्भर होताना दिसून येत आहेत .जादा पैसे देणारे भाडे नाकारुन जेष्ठ नागरिकांसाठी व कुठे अपघात घडला असेल अथवा रात्री अपरात्री महिलांच्या प्रसुतीसाठी बोलावणे आलेच तर त्यांना प्रथम प्राधान्य देत वरिल अडचणीत असणार्यांना तात्काळ सेवा देण्यासाठी प्रतिक्षा वाघमारे नेहेमी तत्पर असतात.सद्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरु असुन या विद्यार्थ्यांना वेळेवर परिक्षा केंद्रा पर्यंत पोहोचण्यासाठी कोणतीही अडचण होवू नये यासाठी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सामाजिक बांधिलकी जपत एका अनोख्या सामाजिक उपक्रम सुरु करुन या विद्यार्थ्यांसाठी आपल्या रिक्षाच्या माध्यमातून मोफत सेवा स...

आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनीचा वर्धापन दिन लोहोप प्रा आ केंद्रात उत्साहात साजरा,केंद्रीय आरोग्य मंत्रीनि साधला ऑनलाइन संवाद

किशोर साळुंके :- आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी या उपक्रमाच्या चौत्या वर्धापणदिना निमित्ताने केंद्रीय आरोग्य मंत्री यांनी ऑनलाइन संवाद साधण्यासाठी रायगड जिल्ह्यातील नव्यानेच सुरू झालेल्या खालापूर तालुक्यातील लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्रातीळ आरोग्य अधिकारी डॉ सीमा पाईकराव यांची निवड करण्यात आली असून लोहोप येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून या उपक्रमाचे उदघाटन करण्याचा मान लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळाला असून या उपक्रमाचे उदघाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुधाकर मोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडवैया यांनी आरोग्य कर्मचारी आणि रुग्णांशी संवाद साधून विविध प्रकारे मार्गदर्शन केले. भारत सरकार कडून चार वर्षांपूर्वी 14 एप्रिल 2018 रोजी आरोग्य विभागाकडून आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी हा उपक्रम सुरू करण्यात आला होता या उपक्रमाला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे या निमित्ताने या उपक्रमाचा आज चौथा वर्धापनदिन आहे.त्यामुळे प्रत्येक जिल...