खोपोली :(प्रतिनिधी ) : खोपोली नगरीत आज सायंकाळी साधारण ७ चे सुमारास अपघात घडला असता अपघात ग्रसतांच्या टीमसह खोपोली नगर परिषदेचे नगरसेवक यांनी धाव घेऊन सदर अपघात ग्रस्तास उपचारासाठी दाखल केले.
आज सायंकाळी साधारण ७ वाजताचे सुमारास शाम सुंदर राय. (रा. पटेल नगर, खोपोली ) हा इसम युनिमाउंट बिल्डिंग समोरच्या रस्त्यावरून जात असताना एका दुचाकी वाहनाने उडविल्याचे समजले. तात्काळ अपघात ग्रसतांची टीम, स्थानिक नागरिक, रिक्षा चालक यांनी धाव घेऊन अपघात ग्रस्तास खोपोली नगर परिषदेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय येथे दाखल केले. खोनपा चे नगरसेवक प्रशांत कोठावळे, नगरसेवक नासिरभाई पटेल, गुरु साठीलकर, खोपोलीतील युवा वर्ग यांनी मोठी धावपळ केली.
खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु असून दवाखान्यातील डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी रुग्णास इतर रुग्नालयात हलविण्यात आले.
(सचिन यादव -LIVE )
खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे
खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...
Comments
Post a Comment