Skip to main content

प्रभाग ३ चे नगरसेवक किशोर पानसरे यांच्या प्रयत्नातून विहारी ठाकुरवाडी येथील आदिवासी बांधवांसाठी शेकडो कोव्हिशिल्डचे लसीकरण. मुख्याधिकारी अनुप दुरे , नगराध्यक्षा सुमन औसरमल व प्रभाग ३ चे लोकनेते तथा कर्तव्यदक्ष नगरसेवक किशोर पानसरें यांचे आदिवासी बांधवांनी मानले आभार... .

खोपोली.- प्रतिनिधी-- (किशोर साळुंके ) कोरोनाच्या तिसर्या लाटेचा धोका टाळण्यासाठी तसेच आपल्या प्रभागातील विहारी ठाकुरवाडी येथील आदिवासी बांधवांच्या आरोग्यास धोका निर्माण होवू नये या प्रामाणिक उद्देशाने प्रभाग क्रमांक ३ मधील विकासपुरुष ,लोकनेते तथा सामाजिक कार्यात सक्रिय असणारे खोपोली पालिकेचे विद्यमान नगरसेवक किशोर पानसरे यांच्या प्रयत्नातून खोपोली शहरातील विहारी ठाकुरवाडीतील शेकडो आदिवासी बांधवांसाठी कोव्हिशिल्ड या दूसर्या डोसचे लसीकरण करण्यात आले. काही महिन्यांपूर्वी पालिकेच्या माध्यमातून शहरातील काही गावांमधील नागरिकांना पहिल्या डोसचे लसीकरण सूरु करण्यात आले होते परंतू वरिल डोस घेण्याकरता आँनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी महागडा स्मार्टफोन त्यासाठी लागणारा महागडा मोबाईल डाटा यांसारखी खर्चिक बाब व रजिस्ट्रेशन करण्यासाठी किचकट असलेल्या प्रक्रियेमुळे आदीवासी बांधवांनी लसीकरणाकडे पाट फिरवली होती .सदर बाब नगरसेवक पानसरे यांच्या लक्षात आली असता पालिकेच्या वतीने यावेळी संपूर्ण शहरातील गावागावात लसीकरण मोहीम सूरु करण्यात आली असताना , विहारी ठाकुरवाडी येथील आदीवासी बांधवांसाठी सर्वप्रथम पहिल्या डोसचे लसीकरणास प्राधान्य द्यावे यासाठी पानसरे यांनी पालिका प्रशासनाकडे विनती करत ,वाडीतील आदिवासी बांधवांसाठी पहिला डोस देण्याची मागणी करत लसीकरण मोहीम राबवण्यात आली होती.यावेळी विहारी ठाकुरवाडीतील नागरिकांसाठी पहिल्या डोसचे लसीकरण विहारी ठाकूरवाडीतच उपलब्ध करुन देण्यात आले होते , पहिल्या डोस प्रमाणेच दूसरा डोस सुद्धा आपल्या वाडीतीमधे उपलब्ध व्हावा यासाठी गावातील नागरीकांनी पानसरे यांना साकडे घातले, येथील नागरिकांना कोरोना या जिवघेण्या महाभयंकर रोगाची लागण होवू नये , दोन डोस घेणे बंधनकारक असल्याने येथील नागरिकांना नोकरी व प्रवासासाठी अडचणी येवू नये तसेच लसीकरण केंद्रावर होणार्या लांबचलांब रांगांमुळे आदिवासी बांधवांना नाहक त्रास होवू नये या प्रामाणिक उद्देशाने नगरसेवक किशोर पानसरे यांनी खोपोली पालिकेचे मुख्याधिकारी अनुप दुरे , नगराध्यक्षा सुमन औसरमल यांची भेट घेत प्रभाग क्र.३ मधील विहारी ठाकुरवाडीतील नागरिकांसाठी वाडीत लसीकरण मोहीम राबविण्याची विनंती करुन पानसरे यांच्याच माध्यमातून उभारलेल्या बहुमजली क्रांतिवीर बिरसा मुंडा सभागृहात शेकडो आदिवासी बांधवांसाठी कोव्हिशिल्डच्या दूसर्या डोसचे लसीकरण करण्यात आले.आपल्या गावातील आदिवासी बांधवांच्या आरोग्याची काळजी करणारे तसेच आदिवासी बांधवांना लसीकरण करण्यासाठी येणार्या अडचणी लक्षात घेवून किशोर पानसरे यांनी आपल्या गावामधेच दूसर्या डोसचे लसीकरण उपलब्ध करुन दिल्याबद्दल येथील नागरिकांनी खोपोली पालिकेचे मुख्याधिकारी अनुप दुरे ,नगराध्यक्षा सुमन औसरमल व या प्रभागाचे लोकनेते तथा कर्तव्यदक्ष नगरसेवक किशोर पानसरे यांचे आभार मानले. संपूर्ण ठाकूरवाडीतच बंधू व भगिनिंना कोरोनाचा धोका निर्माण होवू नये याच उद्धेशने आपण लसीकरण करत आहोत अशी प्रतिक्रिया किशोर पानसरे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली. दूसरा डोस महिला व पुरुष यांचे लसीकरण करण्यात आले.यावेळी गावातील सामाजिक कार्यकर्ते तथा युवानेते नारायण निर्गुडे, नानू निर्गुडे मंगल उगडे,संतोष मेंगाल व गावातील नागरिकांनी वरिल लसीकरण मोहीम राबविण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.

Comments

Popular posts from this blog

खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे

खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...

रेसिलियेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून एक्स्प्रेस वेवर प्रथमोपचार प्रशिक्षण शिबिराचे आयोजन.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर होणाऱ्या अपघातात मदत करणारे पळस्पे आणि बोरघाट पोलिस विभागाचे अधिकारी व कर्मचारी, रस्त्यांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, टोल प्लाझा मधले आय. आर. बी. चे कर्मचारी व महामार्गावर दुरुस्ती काम करणाऱ्या कामगाराना रेसिलियेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून गोल्डन अवर मध्ये उपचार आणि बचाव कार्य संबंधीचे धडे भूपेंद्र मिश्रा यांनी दिले. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या संसाधनातून, तंत्रशुद्धरित्या, तत्काळ आणि सहजपणे प्रथम उपचार कसे करता येतात, याबद्दल प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. अपघातात चुकीच्या पद्धतीने जखमींना हाताळल्याने गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात हे वेगवेगळ्या पद्धतीने शिबिरार्थींना समजावून देत तसे प्रकार टाळण्याकरिता योग्य उपाय सुचविले. रेसिलियेंट फाऊंडेशने आयोजित केलेल्या शिबीराचे संदर्भात अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या गुरुनाथ साठेलकर यांनी प्रास्ताविक केले तर पोलिस वाहतूक विभागाकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी यांनी आभार व्यक्त केले. रेसिलियेंट फाऊंडेशन, महाराष्ट्र पोलीस, वाहतूक पोलिस यंत्रणा आणि प्र...

आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनीचा वर्धापन दिन लोहोप प्रा आ केंद्रात उत्साहात साजरा,केंद्रीय आरोग्य मंत्रीनि साधला ऑनलाइन संवाद

किशोर साळुंके :- आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी या उपक्रमाच्या चौत्या वर्धापणदिना निमित्ताने केंद्रीय आरोग्य मंत्री यांनी ऑनलाइन संवाद साधण्यासाठी रायगड जिल्ह्यातील नव्यानेच सुरू झालेल्या खालापूर तालुक्यातील लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्रातीळ आरोग्य अधिकारी डॉ सीमा पाईकराव यांची निवड करण्यात आली असून लोहोप येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून या उपक्रमाचे उदघाटन करण्याचा मान लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळाला असून या उपक्रमाचे उदघाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुधाकर मोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडवैया यांनी आरोग्य कर्मचारी आणि रुग्णांशी संवाद साधून विविध प्रकारे मार्गदर्शन केले. भारत सरकार कडून चार वर्षांपूर्वी 14 एप्रिल 2018 रोजी आरोग्य विभागाकडून आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी हा उपक्रम सुरू करण्यात आला होता या उपक्रमाला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे या निमित्ताने या उपक्रमाचा आज चौथा वर्धापनदिन आहे.त्यामुळे प्रत्येक जिल...