खोपोली - प्रतिनिधी--
किशोर साळुंके .
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं ०६ डिसेंबर रोजी शिवशाही व्यापारी संघटणा खोपोली शहराच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास सर्वसामान्य जनतेच्या न्यायहक्कासाठी लढणारी शिवशाही व्यापरी संघटनेचे संस्थापक,अध्यक्ष युवराज दाखले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी खोपोली पालिकेचे माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसुरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक मनिष यादव,आर पी आय(A )गटाचे कोकण प्रदेश अध्यक्ष तुषार कांबळे,शिवशाही व्यापारी संघटनेचे खोपोली शहर कार्याध्यक्ष तौफिक करजीकर, शिळफाटा प्रभाग क्रमांक 07 उपाध्यक्ष मयुर पातकर,सोनु परदेशी,आदी पदाधिकारी उपस्थित होते.
खोपोलीमध्ये डाँ.आंबेडकर संस्कार केंद्राच्या जागेत अतिक्रमण .. आर.पी.आय .पक्षाकडून कारवाई करण्याची मागणी .. त्वरित कारवाई न झाल्यास तिव्र आंदोलनाचा दिला इशारा .
. खोपोली -(किशोर साळुंके ) खोपोली शहरातील यशवंतनगर येथे भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर संस्कार केंद्राच्या जागे समोर एका कुटुंबाने जाणिवपूर्वक अनाधिकृतपणे बांधकाम करण्याचा घाट घातल्याने सदर बांधकाम करणार्यांवर कारवाई करण्याची मागणी रिपब्लीकन पार्टी आँफ इंडिया पक्षाच्या वतीने खोपोली पोलीस ठाण्यात दि.११ /०३/ २०२२ रोजी करण्यात आली आहे.खोपोली नगरपरिषद हद्दितील यशवंतनगर शिळफाटा येथे राजगीरी बुद्ध विहाराची इमारत होती त्या जागेत खोपोली नगरपरिषदेच्या वतीने भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर संस्कार केंद्रासाठी जिल्हा नियोजन आधिकारी अलिबाग यांच्याकडून निधी व तांत्रिक मंजूरी मिळवून रीतसर काम सुरु झाले आहे.साधारण पन्नास लक्ष रुपये रुपये किमतीचे हे बांधकाम असून खोपोली नगरपरिषदेकडून काम सुरु आहे.परंतू सदर ठिकाणी राहणारे गोसावी परिवाराकडून सदर जागेत अनधिकृत बांधकाम करण्याच्या उद्धेशाने त्यांनी सदर जागेसमोरील स्वताच्या घराची भिंत तोडून तेथे दरवाजा काढून बेकायदेशीपणे वाढीव बांधकाम करण्याचा प्रयत्न त्यांनी जाणीवपूर्वक संस्कार केंद्रा लगतच्या जागेसमोरील वहिवाटीचा रस्ता नसतानाही स्वताच्या घराची भिंत त
Comments
Post a Comment