खोपोली - प्रतिनिधी-- (किशोर साळुंके ) खोपोली पोलीस ठाण्याच्या स्थापनेला 50 वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून, या वर्षीपासून पोलीस ठाणे हद्दीतील सार्वजनिक गणपती मंडळांमध्ये विविध मुद्द्यांवर स्पर्धा सुरू करण्यात आली होती व या स्पर्धेच्या विजेत्यांना “विघ्नहर्ता पुरस्कार” सोहळा खोपोली शहरातील गगनगिरी महाराज यांच्या लगत असलेले कँम्पोलियन रिसाँर्ट येथे वरिल सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या
कार्यक्रमासोबतच
पोलीस ठाणे आवारात महिला पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यासाठी स्वतंत्र विश्रामगृहाच्या इमारतीच्या वास्तुची पायाभरणी समारंभ पार पाडण्यात आला. 2021 या पारितोषिक वितरण सोहळ्यात रायगडचे पोलीस अधिक्षक अशोक दुधे,खालापूर तालुका उप विभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला ,खोपोली नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सुमन औसरमल ,खोपोली पोलीस निरिक्षक शिरीष पवार, रसायनीचे पोलीस निरीक्षक अशोक डोंगरे,यांच्या प्रमुख उपस्थितीत
खोपोली शहरासाठी सामाजिक कार्यात स्वतःला वाहून घेणाऱ्या
अपघातग्रस्तांच्या मदतीला,
सहज सेवा फाउंडेशन,
खोपोली अॅक्ट,
अल्टा लॅबोरेटरीज
या ध्येयवेड्या वरिल चार सामाजिक संस्थांना सन्मानित करण्यात आले.
खोपोलीचे रहीवाशी असणारे कमांडर आशिष कोरे यांचा व्यक्तीविशेष म्हणून यावेळी सन्मान करण्यात आला.
पोलीस ठाणे हद्दीत असणाऱ्या गावातील सर्व पोलिस पाटलांना युनिफॉर्म देण्यात आले.
तर ग्रामीण भागांत ग्रामरक्षक दलाची स्थापना करुन त्यांची ओळख पटावी म्हणून टी-शर्ट, काठी, शिट्टि इत्यादी वस्तुंचे वाटप करण्यात आले.
तसेच लोकांचे हरविलेले २३ मोबाईल शोधून यावेळी लोकार्पण करण्यात आले.या सोहळ्या दरम्यान विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर होणाऱ्या अपघातात मदत करणारे पळस्पे आणि बोरघाट पोलिस विभागाचे अधिकारी व कर्मचारी, रस्त्यांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, टोल प्लाझा मधले आय. आर. बी. चे कर्मचारी व महामार्गावर दुरुस्ती काम करणाऱ्या कामगाराना रेसिलियेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून गोल्डन अवर मध्ये उपचार आणि बचाव कार्य संबंधीचे धडे भूपेंद्र मिश्रा यांनी दिले. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या संसाधनातून, तंत्रशुद्धरित्या, तत्काळ आणि सहजपणे प्रथम उपचार कसे करता येतात, याबद्दल प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. अपघातात चुकीच्या पद्धतीने जखमींना हाताळल्याने गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात हे वेगवेगळ्या पद्धतीने शिबिरार्थींना समजावून देत तसे प्रकार टाळण्याकरिता योग्य उपाय सुचविले. रेसिलियेंट फाऊंडेशने आयोजित केलेल्या शिबीराचे संदर्भात अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या गुरुनाथ साठेलकर यांनी प्रास्ताविक केले तर पोलिस वाहतूक विभागाकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी यांनी आभार व्यक्त केले. रेसिलियेंट फाऊंडेशन, महाराष्ट्र पोलीस, वाहतूक पोलिस यंत्रणा आणि प्र...
Comments
Post a Comment