खोपोली - (किशोर साळुंके ) भारतीय संविधानाचे शिल्पकार डाँक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेली प्रस्ताविका खोपोली नगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारा समोरील भिंतीवर लावण्यात आली आहे. सदरील लावण्यात आलेले संविधान प्रस्ताविका अस्पष्ट शब्दांमधे दिसत असल्याचे खोपोली शहरातील शिवशाही व्यापरी संघाचे अध्यक्ष शिवराज दाखले, कार्याध्यक्ष तौफिक करजीकर व काही पदाधिकार्यांच्या निदर्शनास आली असता पालिकेत लावण्यात आलेले भारताचे संविधान प्रस्ताविका येथे येणार्या नागरिकांना स्पष्टपणे वाचता यावे यासाठी अस्पष्ट शब्दांमधे लावण्यात आलेले प्रस्ताविका बदलून स्पष्ट असे वाचन करता येवू शकेल अशी प्रस्ताविका लावण्यात यावी अशी मागणी खोपोली शहर शिवशाही व्यापारी संघटने मार्फत खोपोली पालिकेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे
खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...
Comments
Post a Comment