खोपोली प्रतिनिधी :=( किशोर साळुंके )
कधीकाळी शिक्षण घेण्याच्या निमित्ताने एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांनी 37 वर्षानंतर स्नेहसंमेलनात सहभाग घेतला. विद्यार्थीदशेत निर्माण झालेली भावनात्मक बांधिलकी जपत आपल्या तत्कालीन शिक्षक, शिक्षका आणि मित्रांसमवेत एकत्र येऊन मान्यवरांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी विद्यालय वावोशी मध्ये 1984 या वर्षी पास आउट झालेल्या दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र आपला स्नेह द्विगुणित केला.
2 जानेवारी 2022 रोजी वावोशी जवळच्या आपटी गावातल्या राजेंद्र पाटील यांच्या फार्महाऊसवर या स्नेहसंमेलनाचे आयोजन केले होते. यानिमित्ताने खालापूर तालुक्याचे तहसीलदार आयुब तांबोळी आणि खालापूर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अनिल विभुते यांनी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कराड अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे गुरुनाथ साठेलकर, निवृत्त शिक्षक एस के पाटील आणि एम डी पाटील आणि निवृत्त शिक्षिका श्रीमती प्रमिला पवार आणि श्रीमती रंजना पाटील इत्यादी मान्यवर निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित होते.
आजवर आपण पोलीस दलात कामगिरी बजावत असताना क्राईम डिटेक्शनमध्ये फक्त गुन्हेगारांशी संवाद साधत आलो, मात्र या कार्यक्रमाच्या निमित्ताने सज्जन लोकांच्या समवेत हितगुज करण्याची संधी मिळाल्याने एका वेगळ्या आनंदाचा लाभ घेण्याचा योग आल्याचे प्रतिपादन करत असताना, आपणही अश्याच स्वरूपात आपल्या सहकारी विद्यार्थ्यांना एकत्र आणून स्नेहसंमेलन साजरे करू असे अभिवचन सहायक पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी दिले.
सामाजिक कार्य करत असताना आपल्या सोबत समाजातील दक्ष नागरिक म्हणून भूमिका बजावणाऱ्यांची आपल्याला नेहमीच मोलाची साथ मिळाल्याचे सांगत, आमच्या कामाची दखल घेऊन अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या अभियानातील सदस्यांना स्वखर्चाने ड्रेस कोड अर्थात युनिफॉर्म देणाऱ्या स्नेहसंमेलन आयोजकांचे आभार मानले. निवृत्त शिक्षिका आणि शिक्षकांनी गत स्मृतींना उजाळा देत विद्यार्थ्यांशी गप्पांच्या स्वरूपात संवाद साधला.
या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते किशोर ओसवाल, राजेंद्र पाटील, उद्योजक अजित भोसले, ज्येष्ठ शिक्षक संजय नेमाने या माजी विद्यार्थी आणि हात मदत करणाऱ्या देवदूतांचा सन्मान करण्यात आला. धोंडीबा हिरवे या आदिवासी समाजातल्या माजी विद्यार्थ्याने बालवयातील कवितांचे भावपूर्ण सादरीकरण केले. राजेंद्र पाटील, किशोर ओसवाल, संजय नेमाणे, प्रकाश घारे इत्यादीनी देखील यावेळी आपली मनोगते व्यक्त केली.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांनी धकाधकीच्या जीवनातील ताण तणाव बाजूला सारून अखंड दिवसभर वेगवेगळ्या कार्यक्रमातून आपला आनंद व्यक्त केला.
खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनचा इशारा .. त्वरित मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार - दिलीप सोनावणे
खोपोली प्रतिनिधी - (किशोर साळुंके ) नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणा करीत असल्याने कर्मचाऱ्यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत,संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचारयांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने पांठिबा दिला असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी दिली आहे.मात्र या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होणार आहे ते पालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात 4 राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृ...
Comments
Post a Comment